इंदापूर : वडापुरीत साडेसात लाखचे डीझेल चोरी

पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर तालुक्यातील मौजे वडापुरी येथे नव्याने काम सुरू असलेल्या JG राऊत पेट्रोल पंपातील डीझेल टाकीमधील 7 लाख, 51 हजार रूपये किमतीचे डीझेलची अज्ञात चोरट्यांने चोरी केली असल्याची फिर्याद निखील नंदकिशोर राऊत.(वय 34) रा.अकलुज, ता.माळशिरस, जि. सोलापूर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दीली आहे.तर दीड महिण्यात इंदापूर तालुक्यातील पेट्रोल पंपामध्ये डीझेल, पेट्रोल चोरीच्या तीन घटना घडल्याने इंदापूर तालुक्यातील पेट्रोलपंप चालकांमधे घबराटीचे वातावरण आहे.

इंदापूर तालुक्यातील मौजे वडापूरी गावचे हद्दीत अकलुज येथील निखील राऊत यांचे मालकीचे नवीन पेट्रोल पंपाचे काम सुरू असुन सदर पंपाचे कामकाज हे फीर्यादी यांचे बंधु निरज नंदकीशोर राऊत हे अकलुज येथुन येवुन जावुन पहात असतात. पेट्रोलपंप चालु नसल्याने पंपावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याची सोय नाही परंतु वाॅचमन असतो. दिं.12 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता निरज राऊत यांनी सदर पेट्रोल पपांच्या डीझेल टाकीचे गेज डिपराॅडने ( टाकीतील डीझेल मोजण्याचे साधन) चेक केले असता 137.9 म्हणजेच 14 हजार 989 लिटर इतके भरले होते.त्यानतर दि.14 रोजी वरील पद्धतीने डीझेल चेक केले असता टाकीतील डीझेल हे 58.00 इतकेच म्हणजे फक्त 4 हजार 842 लिटर आढळुन आल्याने टाकीत 10 हजार 147 लिटर डीझेल कमी असल्याचे दीसुन आल्याने निरज राऊत यांना डीझेल चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला.

सदर डीझेलचा दर हा 70.05 रूपये प्रति लिटर असुन एकुण 10 हजार 147 लिटर डीझेलची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले आसुन त्याची किंमत 7 लाख 51 हजार 385 इतकी आहे. सदर प्रकरणी निखील नंदकिशोर राऊत.रा. अकलुज यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याने डीझेल चोरी केल्याची फीर्याद दीली असुन पुढील तपास पो.ह. विनोद पवार हे करत आहेत. तर त्याच दरम्यान लासुर्णे येथील कुणाल आटोलाईन्स पेट्रोल पंपावरही अशाच प्रकारे चोरीचा प्रकार घडला आहे.तर 22 आक्टोंबर 2020 रोजी गणेश पेट्रोलियम हिंगणगाव येथील भारत शिंदे यांचे नविन पंपाचे काम सुरू असताना असाच प्रकार घडला असुन यामध्ये सराईत टोळीचा हात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन तालुक्यात नागरीकिंमध्ये भीतीचे वातावरण आहे.