Indapur News : अनैतिक संबधाच्या संशयातुन 23 वर्षीय युवकाचा हात,पाय व मुंडके तोडुन निर्घुन खुन, प्रचंड खळबळ

इंदापूर : गणेशवाडी (ता.इंदापूर) येथील भिमानदीवरील गारअकोले पुलाजवळील नदीपात्रात टाकळी (टेंभुर्णी) ता.माढा येथील 23 वर्षीय युवकाचे अनैतीक संबधाच्या संशयावरून त्याच्याच चार मीत्रांनी धारदार शस्त्राने दोन्ही हात, दोन्ही पाय व धडापासुन मुंडके तोडुन निर्घुन खुन केल्याची घटना गणेशवाडी येथे घडली आहे.तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मयताचे धडावेगळे केलेले दोन्ही हात,पाय व मुंडके गायब करून ( मतदेह) धड भीमानदीच्या पात्रात फेकुन दील्याची घटना इंदापूर पोलीसांच्या कार्यतत्परतेमुळे उघडकीस आली आहे. यातील दोन आरोपींना इंदापूर पोलीसांनी जेरबंद असुन याबाबतची फिर्याद मृृृृत युवकाची आई सौ.मंजुषा महादेव गोरवे (वय 51),रा. टाकळी (टेंभुर्णी), ता.माढा, जि. सोलापूर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दीली आहे.

संजय महादेव गोरवे (वय 23) रा. टाकळी (टेंभुर्णी),ता.माढा, जि. सोलापूर असे निर्घुन खुन झालेल्या युवकाचे नाव आहे.तर दादा कांबळे. रा.बावडा, लकी विजय भोसले, विकी उर्फ व्यंकटेश विजय भोसले व महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे अशी आरोपींची नावे असुन यापैकी विकी उर्फ व्यंकटेश भोसले व महेश उर्फ शैलेश सोनवणे या दोन आरोपींना इंदापूर पोलीसांनी दोन तासात अटक करून गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मीळवले आहे. फीर्यादीत म्हटले आहे की मत संजय, लकी,विकी व महेश हे एकमेकांचे मित्र असल्याने त्याचे त्यांचे घरी जाणे येणे होते.यातुनच लकी, विकी व महेश यांच्या नातेवाईक असलेल्या सुनिता,सखुबाई व कोमल (नावे बदलुन ठेवली आहेत) यांचेशी संजय याची ओळख झाली होती.

ओळखीचा फायदा घेवुन वरील तीघीजणी संजय यास छोट्या मोठ्या कामासाठी घरी बोलवत असत व त्याचे गाडीवर बसुन फीरून त्यांची कामे करून घेत असत.संजयच्या याच जवळकीच्या संबधाचा संशय त्याचे मित्र लकी, विकी, व महेश यांना आल्याने त्यांनी त्यांचे बावडा येथील काका दादा कांबळे यांचे घरी जेवणाचा कार्यक्रम असल्याचे निमंत्रण देवुन रविवार दिनांक 17 जानेवारी 2021 रोजी संध्याकाळी संजय यास बावडा येथे बोलावुन घेतले होते. हे फीर्यादी यांना माहीत होते.त्या दीवशीपासुन फीर्यादी यांचा मुलगा संजय हा घरी परत न आल्याने फीर्यादी यांनी दिनांक 19 जानेवारी रोजी संजय बेपत्ता असल्या बाबतची तक्रार टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दीली होती.

बेपत्ता संजय याचा सर्वत्र शोध घेत असताना गावातील एकाचा फिर्यादी यांचा पुतण्या याला फोन आला व गारअकोले पुलाजवळ भिमा नदीपात्रात पाण्यामध्ये एक प्रेत तरंगत असल्याचे सांगीतले. त्या ठीकाणी जावुन पाहीले असता पाण्यात हात पाय व डोके नसलेले प्रेत आढळुन आले.सदर ठीकाणी आढळुन आलेली चप्पल, प्रेताचे अंगावरील काळ्या रंगाचा बरमुडा पॅन्ट व जन्मत: असलेल्या खुनावरून सदरचे प्रेत हे फीर्यादी यांचा मुलगा संजय याचेच असल्याची खात्री पटल्याने त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फीर्याद दीली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की दादा कांबळे.रा.बावडा, लकी विजय भोसले, विकी उर्फ व्यंकटेश  भोसले व महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे यांना सुनिता, सखुबाई व कोमल यांचे व मत संजय याचे असलेले जवळकीच्या संबधाचा संशय घेवुन त्यास दि.17 रोजी जेवणाचे खोटे निमंत्रण दीले. व रात्रीच्या वेळी बावडा गणेशवाडी गावचे हद्दीत,भिमानदीच्या गारअकोले पुलाजवळील नदीपात्रात नेऊन कोणत्यातरी धारदार हत्याराने संजय याचे दोन्ही हात, दोन्ही पाय व डोके तोडुन त्याचा निर्घुन खुन केला.व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे तोडलेले दोन्ही हात,पाय व डोके हे कोठेतरी फेकुन दीले व मृृतदेह (धड ) याची ओळख पटु नये यासाठी ते भिमानदी पात्रात फेकुन दीले असल्याचे फीर्यादीत म्हटले असुन पुढील तपास इंदापूर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हे करत आहेत.