Indapur News : बाभुळगाव तुषार आसबे मारहाण प्रकरणी आरोपी अद्याप मोकाटच

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   बांधावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बाभुळगाव येथील शेतकरी पती-पत्नीस शेतात काम करत असताना लोखंडी राॅड व लाकडी दांडके असलेल्या लोखंडी फावड्याने जबर मारहाण करून गंभिर जखमी केल्या प्रकरणी संतोष बाबु भोसले व त्याची पत्नी रेणुका संतोष भोसले दोघे रा. बाभुळगाव, ता.इंदापूर,जि.पूणे यांचे विरूद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक ९ डिसेंबर २०२० रोजी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे.परंतु गुन्हा दाखल होउन आठ दिवस उलटले तरी इंदापूर पोलीसांना आरोपी सापडत नसल्याने पोलीसांच्या कार्यतत्परतेविषयी नागरिकांमधुन शंका उपस्थित होत आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की मंगळवार दिनांक ८ डिसेंबर २०२० रोजी तुषार प्रताप आसबे (वय ३०) रा. बाभुळगाव व त्याची पत्नी ज्योती तुषार आसबे हे शेतकरी पती-पत्नी दुपारी २ वा.चे सुमारास त्यांचे शेतात काम करत असताना त्यांचे शेतीच्या बांधाशेजारील शेतकरी संतोष बाबु भोसले व त्याची पत्नी रेणुका संतोष भोसले यांनी तुषार आसबे यांचे शेतात येवुन आसबे पती पत्नीला लोखंडी राॅड व लाकडी दांड्याच्या लोखंडी फावड्याने जबर मारहान करून गंभिर जखमी केल्याची घटणा घडली होती. या घटनेची फिर्याद तुषार आसबे यांनी इंदापूर येथे हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना दिनांक ९ डिसेंबर रोजी इंदापूर पोलीसांत दाखल केली होती.

घटना घडल्यापासुन ते आज अखेर पर्यंत तुषार आसबे यांचेवर इंदापूर येथील विघ्नहर्ता अ‍ॅक्सिडेंट हाॅस्पिटल व अ‍ॅडवान्स ट्रामा सेंटर या ठीकाणी उपचार सुरू आहेत. त्यांचे पायाचे उजवे मांडीला व डावे हाताचे पोटरीवर व मनगटाजवळ गंभिर जखम झाली असल्याने त्यांचेवर हाॅस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत.घटना घडून आठ दिवस उलटुन गेले तरी सदर प्रकरणाचे तपास अधिकारी यांना आरोपीच सापडत नसल्याने फिर्यादी व नागरीकांतुन नाराजीचा सुर उमटत आहे.तर फीर्यादी व त्यांचे कुटुंबाला मोकाट फिरणारे आरोपी व त्यांचे नातेवाईक यांचेकडुन पुन्हा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आसबे कुटुंबीय सध्या दहशतीच्या छायेखाली वावरत आहे.

फीर्यादीच्या मते इंदापूर पोलीसांकडुन तपासाच्या नावाखाली कागदोपत्री घोडे नाचविण्याचा प्रकार सुरू असुन याचा मनस्ताप फीर्यादींना सोसावा लागत आहे.तर आरोपी कुठे दिसला तर आम्हाला कळवा असे पोलीसांकडुन फीर्यादी यांनाच सांगण्यात येत असल्याचे फीर्यादी यांचे म्हणणे आहे. इंदापूर पोलीना आरोपीं का सापडत नाहीत याचे परफेक्ट उत्तर तपास अधिकारी देवु शकत नसल्याने आरोपींना मोकाट फीरण्यास रान मोकळे आहे.परंतु फिर्यादी व त्यांचे कुटुंबाला आरोपीकडुन पुन्हा धोका होण्याची शक्यता असुन आरोपींना पोलीस तपास अधिकार्‍यांनी तात्काळ अटक करुन कायदेशिर कारवाईचा बडगा उगारावा अन्यथा वरिष्ठ पातळीवरून दाद मागावी लागणार असल्याचे मत फिर्यादी यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.