Independence Day | लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावल्यावर होणार फुलांची बरसात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Independence Day । दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतात (75 वा) स्वातंत्र्य दिन (Independence Day) अमृतमहोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाची जोरदार तयारी सुरु आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यात येतो. याठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देशात कोरोना संसर्गाच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर यंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट रोजी जेंव्हा पंतप्रधान मोदी राष्ट्रध्वज फडकावतील तेंव्हा आकाशातून 2 Mi-17 1V हेलिकॉप्टर्समधून फुलांचा वर्षाव होणार आहे.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)
उद्या 15 ऑगस्ट रोजी अमृतमहोत्सवी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावतील.
त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी (Independence Day)
साजरी करण्यासाठी मार्च 2021 मध्ये गुजरातमधील साबरमती आश्रमामधून
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ समारोहाची देखील सुरुवात केली होती.

स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी
फाळणीच्या दिवसाची आठवण काढली. देशाची फाळणी हा एक भयावह अनुभव आहे.
ही फाळणी विसरताच येणार नाही.
आपल्या लक्षावधी बंधु भगिणींना त्यामुळे स्थलांतर करावे लागले.
द्वेषाच्या वातावरणामुळे जो हिंसाचार झाला त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
असे नमूद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा दिवस फाळणीच्या भयावह अनुभवाचा स्मृती दिन म्हणून पाळला जावा असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले आहे.

 

Web Title : Independence Day | national flag narendra modi at the independence day celebrations flower petals will be showered

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MNGL Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती

Pune Crime | कोंढव्यातील तरुणाचा खून करुन फरार झालेल्या 3 आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

Jalna Crime | दोघा नराधमांचा अनाथ अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, जालना जिल्ह्यातील संतापजनक घटना