INDIA Alliance Main Bhi Gandhi Rally In Mumbai | ‘इंडिया’च्या ‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट, मुंबईत कार्यकर्ते-पोलिसांत वादंग?

मुंबई : INDIA Alliance Main Bhi Gandhi Rally In Mumbai | ‘इंडिया आघाडी’ने आज मुंबईत काढलेली मी पण गांधी पदयात्रा पोलिसांनी फॅशन स्ट्रीट येथे आडवल्याने कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला (Lathi Charge) केल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टीच्या काही कार्यकर्ते आणि नेत्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. (INDIA Alliance Main Bhi Gandhi Rally In Mumbai)

इंडिया आघाडीची पदयात्रा फॅशन स्ट्रीटजवळ आली असताना पोलीस आणि इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. बॅरिकेट्स तोडून इंडियाचे कार्यकर्ते आणि नेते पुढे जाऊ लागल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांना ताब्यात घेतले आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड, संजय निरुपम सुद्धा या पदयात्रेत सहभागी झाले होते. (INDIA Alliance Main Bhi Gandhi Rally In Mumbai)

इंडिया आघाडीने दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा ते महात्मा गांधी पुतळा या मार्गे पदयात्रा काढण्याची परवानगी मागितली होती. परंतु, हे शांतता क्षेत्र असल्याने तसेच उच्च न्यायालयाचे विविध निर्बंध असल्याचे कारण देत या पदयात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर पोलिसांनी रीगल सिनेमा ते गांधी पुतळा या मार्गाने पदयात्रेची परवानगी दिली.

पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आमदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले की, महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री
जयंतीनिमित्त आम्ही शांततेच्या मार्गाने पदयात्रा काढली होती. परतु, गांधी जयंतीच्या दिवशीच आमच्या पदयात्रेवर
कारवाई करण्यात आली. आमची पदयात्रा रोखण्याचा प्रयत्न झाला.

राज्य सरकारवर टीका करताना आमदार गायकवाड म्हणाल्या, नथुराम गोडसेचे पुजारी गांधीजींचा आवाज दाबू शकत नाहीत.
मला सरकारला एकच प्रश्न विचारायचा आहे की, शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा संविधानाने आम्हाला
दिलेला अधिकार तुम्ही का हिरावून घेत आहात?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | फ्लॅटच्या बाहेर बुटात चावी ठेवणे पडले महागात, पुण्यात चोरट्यांनी घर साफ केलं