‘India’ Coordination Committee Meeting | शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ‘इंडिया’ च्या समन्वय समिती पहिली बैठक आज, अनेक मुद्द्यांवर चर्चेची शक्यता

नवी दिल्ली : ‘India’ Coordination Committee Meeting | विरोधी पक्षांची आघाडी इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (INDIA) च्या १४ सदस्यीय समन्वय समितीची पहिली बैठक आज होणार आहे. या बैठकीत पुढील रणनीती, जागा वाटप, निवडणूक प्रचार कार्यक्रम आणि जाहीर सभा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. (‘India’ Coordination Committee Meeting)

राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) नेते मनोज झा यांनी सांगितले की समन्वय समितीची पहिली बैठक आगामी निवडणूकांचा प्रचार आणि जाहीर सभांचे वेळापत्रक ठरवण्यावर लक्ष केंद्रित करेल. पुढील लोकसभेत भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) सामना करण्यासाठी दोन डझनहून जास्त विरोधी पक्षांनी इंडियाची स्थापन केला आहे. इंडियाच्या नुकत्याच झालेल्या घटक पक्षांच्या नेत्यांच्या मुंबईतील बैठकीत आघाडीच्या भविष्यातील कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यासाठी १४ सदस्यीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली होती. (‘India’ Coordination Committee Meeting)

समन्वय समिती विरोधी आघाडीची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था म्हणून काम करेल. या समितीचे आणखी एक सदस्य, तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नाही, कारण ईडीने त्यांना समन्स बजावले असून १३ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. बॅनर्जी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले होते की मला याच दिवशी हजर राहण्यास सांगितले आहे.

पवार आणि बॅनर्जी यांच्याशिवाय समन्वय समितीमध्ये काँग्रेसचे केसी वेणुगोपाल, टीआर बाळू (डीएमके),
हेमंत सोरेन (झामुमो), संजय राऊत (शिवसेना-यूबीटी), तेजस्वी यादव (आरजेडी), राघव चढ्ढा (आप),
जावेद अली खान (सपा), ललन सिंग (जेडीयू), डी राजा (भाकपा), उमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स),
मेहबुबा मुफ्ती (पीडीपी) आणि माकपा नेत्यांचा समावेश आहे.

ठाकरे-पवार यांची मुंबईत भेट
इंडियाच्या समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीच्या एक दिवस आधी, शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
मंगळवारी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी
ही बैठक झाली. बैठक सुमारे ९० मिनिटे चालली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की,
इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक आणि महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाली.
यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत सुद्धा बैठकीला उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील विरोधी पक्षांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल.
उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक ४८ जागा आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kothrud Ganesh Festival 2023 | कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे आयोजन !
दि. २४ सप्टेंबर रोजी होणार उद्घाटन

पुणे : सेवानिवृत्त अति वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची दीड कोटींची फसवणूक, प्रचंड खळबळ