Pune Kothrud Ganesh Festival 2023 | कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे आयोजन ! दि. २४ सप्टेंबर रोजी होणार उद्घाटन

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन, संयोजन दीपक मानकर, संदीप खर्डेकर, अ‍ॅड. मंदार जोशी, किरण साळी व सुनील महाजन यांनी दिली माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Kothrud Ganesh Festival 2023 | सार्वजनिक गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचा नजराणा सादर करणारा कोथरूड गणेश फेस्टिव्हल यंदा दुसरे वर्ष साजरे करीत असून, यंदा रविवार दि. २४ व सोमवार दि. २५ सप्टेंबर २०२३ या दोन दिवशी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा संपन्न होणार आहे. (Pune Kothrud Ganesh Festival 2023)

या महोत्सवाचे उद्घाटन रविवार दि. २४ सप्टेंबर रोजी सायं. ५.०० वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या शुभहस्ते होणार असून विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ. निलमताई गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत (Udya Samant) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संयोजक दीपक मानकर (Deepak Mankar), संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), ॲड मंदार जोशी (Adv Mandar Joshi), किरण साळी (Kiran Sali) व सुनील महाजन (Sunil Mahajan) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune Kothrud Ganesh Festival 2023)

समाजात विविध क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्यांचा उद्घाटन सोहळ्यात “कोथरुड सन्मान” पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. प्रामुख्याने प्रवीण बढेकर (उद्योजक), डॉ संजय चोरडिया (शैक्षणिक),डॉ. जितेंद्र जोशी (आंतरराष्ट्रीय उद्योजक), बुलढाणा अर्बन चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे (बँकिंग क्षेत्र), पं. विजय घाटे (तबला),डॉ.सलील कुलकर्णी (संगीत), देवेंद्र गायकवाड (अभिनेता–दिग्दर्शक) यांचा गौरवमूर्तीमध्ये समावेश आहे. कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे आयोजन ‘आम्ही कोथरूडकर’ यांनी केले असून ‘संवाद पुणे’ यांची निर्मिती आहे. सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रम – उद्घाटनानंतर जिगीषा अष्टविनायक निर्मित ‘संज्या छाया’ हे तुफान लोकप्रिय नाटक सादर होईल.
यामध्ये वैभव मांगले आणि निर्मिती सावंत हे कलाकार असून लेखक प्रशांत दळवी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी,
नेपथ्य प्रदीप मुळ्ये हे असून संगीत पुरुषोत्तम बेर्डे यांचे आहे.

त्याच दिवशी रात्री ९.०० वाजता ‘मराठी हास्यकवी संमेलन’ सादर होईल. यामध्ये ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे,
अशोक नायगावकर, प्रशांत मोरे, नितीन देशमुख, नारायण पुरी, भरत दौंडकर, सारंग पांपटवार, नीलम माणगावे,
वैशाली पतंगे, हर्षदा सुंठणकर आणि मृणालिनी कानिटकर यांचा सहभाग असेल.

सोमवार, दि. २५ सप्टेंबर रोजी दु. १२.०० वा. जेम्स बॉंड ००९ प्रस्तुत 5G गेम शो ‘कोथरूडच्या सौ. सौभाग्यवती’
कार्यक्रम होईल. संदीप पाटील हे याचे सादरकर्ते असून मा. अमृताताई देवेंद्र फडणवीस, मा. सुनेत्राताई अजित पवार,
मा. वृषालीताई श्रीकांत शिंदे, मा. सीमाताई रामदास आठवले आणि अभिनेत्री मा. स्नेहल प्रवीण तरडे यांना आमंत्रित
केले आहे. यामध्ये रोटरी महिला क्लब आणि कनी महिला मंच यांचा विशेष सहभाग असणार आहे असा कार्यक्रम फेस्टीव्हलमध्ये प्रथमच होत आहे.

याच दिवशी सायं. ५.०० वाजता शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्धापनदिनानिमित्त ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा
कार्यक्रम संपन्न होईल. या कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन व निर्मिती उदय साटम यांची आहे.
सौ. ज्योती उदय साटम या कार्यक्रमाच्या सहनिर्मात्या आहेत.

याच रात्री ९.०० वाजता ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम सादर होईल. कवी संदीप खरे आणि संगीतकार सलील कुलकर्णी
हे याचे सादरकर्ते असून संयोजन समिती याचे आयोजक आहेत.

तसेच या फेस्टिव्हलसाठी केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले, राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत,
भाजप प्रदेशाध्यक्ष मा.आ. चंद्रशेखर बावनकुळे,राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, मा. सौ.चित्रा वाघ,
मा. मुरलीधर मोहोळ, मा. राजेश पांडे, मा.धीरज घाटे,अभिनेते प्रवीण तरडे आणि अभिनेते रमेश परदेशी ,
अभिनेते क्षितिज दाते, मेघराज राजेभोसले, शेखर मुंदडा यांच्यासह विविध नेते आणि अभिनेते यांना देखील आमंत्रित केले आहे.

कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे स्वागत अध्यक्ष महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे
पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील भूषविणार असून पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक मानकर,
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी
सदस्य अॅड. मंदार जोशी, महाराष्ट्र प्रदेश युवा सेनेचे सचिव किरण साळी व संवाद पुणे चे सुनील महाजन हे आयोजक आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावरुन रोहित पवारांनी साधला निशाणा, तर विद्यार्थी संघटनेकडून संताप

Sambhaji Bhide Meets Manoj Jarange Patil | संभाजी भिडे यांनी काढली उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची समजूत; म्हणाले, “ते राजकारणी आहेत म्हणून…”

ST Employees Strike in Maharashtra | उद्योगमंत्री उदय सामंतांकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे