आगामी २ वर्षात भारताच्या ‘GDP’चा वेग ‘सुसाट’ ; G – 20 परिषदेला देखील भारतावर ‘विश्वास’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुन्हा सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताच्या अर्थव्यवस्थेचा दर (GDP) वाढत राहील असा विश्वास अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (IMF) ने व्यक्त केला आहे. आईएमएफने जी-२० ची देखरेख नोंदीमध्ये (Surveillance note) भारताचे विकासदर (GDP) चालू आर्थिक वर्षांत ७.३ राहील असा अहवाल दिला आहे. याचप्रकारे २०२० मध्ये विकासदर (GDP) ७. ५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर पाच वर्षांच्या तळाला गेल्याची ताजी आकडेवारी पाहता, हा व्यक्त केला गेलेला आशावाद महत्वपूर्ण आहे.

जी -२० परिषद –

जपानमध्ये ८ आणि ९ जून रोजी जी -२० परिषद भरवण्यात येणार आहे. यामध्ये जी -२० मधील समाविष्ट देशांतील अर्थमंत्री आणि सेंट्रल बँकांचे गव्हर्नर सहभागी होणार आहेत. या बैठकीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण सहभागी होणार आहेत. जी -२० परिषदेपूर्वी सहभागी देशांतील आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात येतो. त्याच्या आधारे जी -२० देशांच्या आर्थिक स्थितीवर विचार विनिमय केला जातो. जी -२० मध्ये भारत, अर्जेंटीना, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपियन संघ, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, मेक्सिको, रशिया, दक्षिण अफ्रिका, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग चीनसह सर्व देशांपेक्षा अधिक असेल : जागतिक बँक

सर्वाधिक वेगाने वाढणारी विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून भारताचे स्थान जागतिक स्तरावर अव्वलच राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करत जागतिक बँकेने भारताचा २०२१ पर्यंत अर्थव्यवस्थेचा दर (GDP) चीनपेक्षा १.५ टक्के अधिक असेल, असे म्हटले. गेल्या, २०१८ मधील ६.६ टक्क्यांच्या तुलनेत चिनी अर्थव्यवस्थेचा वेग चालू, २०१९ मध्ये कमी, ६.२ टक्क्यांवर येईल, असे याबाबतच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०२१ पर्यंत तो ६ टक्क्यांवर येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग चीनसह सर्व देशांपेक्षा अधिक असेल, असेही जागतिक बँकेने नमूद केले आहे.