सरकारने सीरम इंस्टीट्यूटसोबत केली 6.6 कोटी व्हॅक्सीन खरेदी करण्याची डील, 200 रुपयांची असेल लस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाद्वारे विकसित कोरोना व्हायरस व्हॅक्सीनचा खर्च सरकारला प्रति डोस 3-4 डॉलर (219-292 रुपये) येईल. या व्हॅक्सीनची भारतीय विनिर्माता सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने सोमवारी ही माहिती दिली. जगातील सर्वात मोठी व्हॅकसीन विनिर्माता एसआयआयकडे कोविड-19 व्हॅक्सीनच्या डोसच्या उत्पादनाचे लायसन्स आहे आणि आतापर्यंत त्यांनी पाच कोटी डोसचे उत्पादन सुद्धा केले आहे.

एसआयआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पूनावाला यांनी पीटीआय-भाषाला सांगितले की, कंपनी पहिल्या टप्प्यात भारत सरकार आणि जीएव्हीआय (व्हॅक्सीन आणि लसीकरणाची जागतिक आघाडी) देशांना कोविशील्डची विक्री सुरू करेल. यानंतर व्हॅक्सीनची विक्री खासगी बाजारात केली जाईल.

भारतीय औषध नियामक यांनी रविवारी कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिली आहे.

अगोदर भारत आणि जीएव्हीआय देशांना दिली जाईल व्हॅक्सीन

महामारीची सुरुवात झाल्यानंतर पूनावाला यांनी कोविड-19 व्हॅक्सीनच्या बाबतीत मोठी जोखिम घेत यूरोप आणि अमेरिकेला पाठवण्यात येणारी उत्पादने बंद करून सीरमच्या असेंबली लाइनला नव्याने तयार केले. पूनावाला यांनी म्हटले की, प्राथमिकतेच्या आधारावर ही व्हॅक्सीन भारत आणि जीएव्हीआय देशांना दिली जाईल. ते म्हणाले, भारत आणि जीएव्हीआय देशांची गरज पूर्ण केल्यानंतरच खासगी बाजारात ही लस उपलब्ध करून दिली जाईल. खासगी बाजारात ही लस 6-8 डॉलरमध्ये दिली जाईल.

त्यांनी म्हटले की, एक महिन्यापर्यंत या लशीचे 10 कोटी डोस होतील. एप्रिलपर्यंत हा आकडा दुप्पट होईल. सरकारने संकेत दिला आहे की, त्यांना जुलै 2021 पर्यंत 30 कोटी डोसची आवश्यकता असेल. सुरूवातीला ही लस आरोग्य कर्मचार्‍यांना आणि ज्येष्ठांना दिली जाणार आहे.