पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, म्हणे हल्यासाठी भारतच जबाबदार 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत – पाकिस्तानचा वाद सध्या शिगेला पोहंचला आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या लष्कराने पत्रकार परिषद आयोजित केली. त्यावेळी १९४७ पासून भारताने काश्मिरींवर अत्याचार केला आहे. असा आरोप करत पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कसलाही विचार न करता आरोप केले, मात्र चौकशी करत होतो, त्यामुळे आमच्याकडून उत्तर द्यायला उशीर झाला. असे पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी म्हंटले आहे.

गुरुवारी ( १४ फेब्रुवारी ) दुपारी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसवर २०० किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी आदळली. यादरम्यान ४४ जवान शाहिद झाले. विशेष म्हणजे, लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद या संघटनेने हा हल्ला घडवून आणला आहे. विशेष म्हणजे,  या हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची मागणी होत आहे.  यादरम्यान पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी माध्यमांशी संवाद साधून या हल्ल्याचा आणि आमचा काही संबंध नाही, असे म्हणत कोणत्या पुराव्यांवर भारताने पाकिस्तानला जबाबदार ठरवले.?  दहशतवादी हल्ला करून पाकिस्तानला काय मिळणार आहे? असे म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्यातुन हात झटकले. मात्र यादरम्यान आता पाकिस्तान लष्कराने पत्रकार परिषद घेतली.

दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये, पाकिस्तान दहशतवादाविरोधात लढतोय, पाकिस्तानकडून नेहमीच शांततेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याचबरोबर भारत नेहमीच पुलवामा हल्ल्यासारखे आरोप पाकिस्तानवर करत आला आहे, पुलवामा हल्ला हा पाकिस्तानी तरुणाने घडवून आणला आसा आरोप भारत करत आहे, कोणताही विचार न करता भारत पाकिस्तानवर आरोप करत आहे. इतकेच नव्हे तर, १९४७ पासून भारताने काश्मिरींवर अत्याचार केला आहे. असा आरोपही त्यांनी केला. याचबरोबर पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कसलाही विचार न करता आरोप केले आहेत. मात्र आम्ही चौकशी करत होतो, त्यामुळे आमच्याकडून उत्तर द्यायला उशीर झाला. असे पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी म्हंटले आहे.

इतकेच नव्हे तर, काश्मीरमध्ये जवानांचा कडक पहारा असतो. त्या भागात सर्वसामान्य जनतेपेक्षा लष्कराच्या जवानांची संख्या जास्त आहे. सत्तर वर्षांपासून भारतीय सैन्य तिथे आहे. तिथे जर पाकिस्तानी व्यक्ती पोहोचली असा भारताचा दावा असेल, तर मग सुरक्षेत काहीतरी चूक झाली असेल.असे म्हणत गफूर यांनी भारतीय सुरक्षा दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर  ‘पुलवामा हल्ला ज्याने घडवला, तो तरुण काश्मीरचाच रहिवासी आहे. त्याला भारतीय सैन्याने वाईट वागणूक दिली होती, अशा बातम्या सोशल मीडियावर आल्या आहेत. सैन्याने दिलेल्या वर्तणुकीचा राग मनात धरुन त्याने हा हल्ला केला असावा. असा दावाही त्यांनी केला.