चीननं गलवान खोर्‍यात केलेल्या हल्ल्यात कर्नल संतोष बाबूंना हौताम्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व लडाख भागातील गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या हल्यामध्ये भारताचे 16 बिहार रेजिमेंटसे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबा हे शहीद झाले आहेत. सेनेच्या सुत्रांकडून या बातमीला दुजोरा मिळालाय. या हल्ल्यात कर्नल रँकचे कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू यांच्यासोबत आणखीन दोन जवान देखील शहीद झाले आहेत.

कर्नल संतोष बाबू हे गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ चीनी सैनिकांकडून झालेल्या हल्ल्यात हुतात्मा झाले. त्यांच्यासोबत आणखीन दोन जवानांनीही देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं. संतोष बाबू यांची 2 डिसेंबर 2019 रोजी कमांडिंग ऑफिसरपदाची सूत्र आपल्या हाती घेतली होती. हुतात्मा झालेले कर्नल संतोष बाबू चीनच्या सीमेवर गेल्या दीड वर्षापासून तैनात होते. कर्नल संतोष हे मूळचे तेलंगणाच्या सूर्यापेट जिल्ह्याचे रहिवासी आहेत. कर्नल संतोष यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुलं आहेत. त्यांच्या पत्नी दिल्लीमध्ये आहेत. कर्नल संतोष यांची आई मंजुला यांनी भारतीय सेनेकडून सोमवारी दुपारी या घटनेबद्दल सूचना देण्यात आली.

तामिळनाडूच्या पलानी यांना हौतात्म्य
कर्नल संतोष बाबू यांच्यासोबत हुतात्मा झालेले एक जवान तामिळनाडूच्या रामानाथपुरम जिल्ह्याचे रहिवासी आहेत. सीमेवर चीनी सैन्याकडून झालेल्या हल्ल्यात 40 वर्षीय पलानी यांनाही हौतात्म्य आलं. पलानी हे मागील 22 वर्षापासून भारतीय सेनेत कार्यरत होते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई के पलानीस्वामी यांनी ट्विट करून जवानांना आदरांजली अर्पण केली आहे.

झारखंडचे जवान कुंदन ओझांना हौतात्म्य
चीनी सैनिकांच्या हल्ल्यात झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातील डिहारी गावचे कुंदन ओझा यांनाही हौतात्म्य आलंय. ओझा हे देखील बिहार रेजिमेंटमध्ये तैनात होते. झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी जवान कुंदन ओझा यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा देत सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.