काश्मीरप्रश्नी फ्रान्सची भारताला ‘साथ’, दिला ‘हा’ सल्ला (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरचा मुद्दा सर्वांच्याच नजरेसमोर होता. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणीही याबाबत मदत केली नाही मात्र या विषयावर फ्रान्सने पुन्हा एकदा भारताला साथ दिली आहे.

काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेतूनच सुटला पाहिजे. या भागात कुठल्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करता कामा नये, असे वक्तव्य फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूल मॅक्रॉ यांनी केले आहे. सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे पंतप्रधान यांच्यात नुकतीच भेट झाली.

संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना मॅक्रॉ यांनी सांगितले की, काश्मीर प्रश्नाबाबत दोन्बी देशांनी चर्चेतून तोडगा काढला पाहिजे. या भागात कुठल्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करता कामा नये. तसेच हिंसाचार होईल अशी पावले उचलता कामा नहेत. तसेच भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या राफेल विमान करारापैकी पहिले विमाने पुढील महिन्यात भारताला देण्यात येईल, असेही मॅक्रॉ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या या भूमिकेचे कौतुक करत आभार मानले तसेच दोनीही देश दहशदवादविरोधात लढत आहेत आणि पुढेही हा लढा व्यापक होणार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

 

 

You might also like