पोस्ट ऑफीसमध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी 5476 जागांवर मेगा भरती, परिक्षा न देता ‘निवड’, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय पोस्ट विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती होणार आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये ग्रामीण पोस्टमनच्या पदांसाठी हि भरती होणार असून यासाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या तीन राज्यांमध्ये एकूण 5476 जागांसाठी हि भरती होणार आहे. आंध्रप्रदेशमध्ये 2707, छत्तीसगढमध्ये 1799 आणि तेलंगनामध्ये 970 जागांसाठी हि भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 22 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून 14 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. ब्रांच पोस्ट मास्टर (बीपीएम), असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (एबीपीएम) आणि पोस्टमन पदांसाठी हि भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता –
या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे 10 वी पास असून गणित आणि इंग्रजी विषय अनिवार्य आहेत. तसेच ज्या भागात नोकरीसाठी अर्ज करत असाल तेथील स्थानिक भाषेचे ज्ञान हवे.

वयोमर्यादा –
कमीतकमी 18 वर्ष आणि जास्तीतजास्त 40 वर्ष या पदासाठी वयोमर्यादा आहे. त्याचबरोबर काही व्यक्तींसाठी सरकारी नियमांनुसार वयोमानात सूट देखील मिळणार आहे.

निवड प्रक्रिया –
यासाठी कोणतीही परीक्षा होणार नसून उमेदवारांच्या मेरिटच्या आधारे त्यांची निवड केली जाणार आहे. 10 वी पेक्षा अधिक शिक्षण झालेल्या व्यक्तींच्या शिक्षणाचा कोणताही विचार केला जाणार नाही कारण हि निवड केवळ 10 वी च्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.
इच्छुक उमेदवार indiapost.gov.in किंवा appost.in/gdsonline या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like