सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय पोस्ट विभागात 1421 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय पोस्ट विभागात १ हजार ४२१ पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. ही भरती केरळ पोस्टल सर्कल, भारतीय पोस्ट ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदासाठी होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदाला अर्ज करू शकतात. तर हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने असून, त्याची मुदत ८ मार्च पासून ते ७ एप्रिल २०२१ पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी appost.in ही वेबसाईट आहे.

GDS ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टेंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) पुढीलप्रमाणे पदांच्या जागा –

यूआर – ७८४

ईडब्ल्यूएस – १६७

ओबीसी – २९७

पीडब्ल्यूडी ए – ११

पीडब्ल्यूडी बी – २२

पीडब्ल्यूडी सी – १९

पीडब्ल्यूडी डीई – २

एससी – १०५

एसटी – १४

केरळ पोस्टल सर्कल GDS वेतन –

टीआरसीए वर्ग : ४ तास श्रेणी १ साठी किमान १२,०००/- ABPM – डाक सेवक – १०,०००/-

टीआरसीए वर्ग : ५ तास श्रेणी २ साठी किमान BPM – १४,५००/-, ABPM-डाक सेवक – १२,०००/-

शैक्षणिक पात्रता –
भारत आणि राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त बोर्डात गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजीत १० वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक, आणि माध्यमिक शाळा परीक्षा ही ग्रामीण डाक सेवकांच्या सर्व मान्यताप्राप्त प्रवर्गासाठी शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे.

स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक –
कमीत कमी १० वी पर्यंत स्थानिक भाषेतून शिक्षण घेतलेलं असावा.

वयाची अट –
१८ ते ४० वर्ष (आरक्षित वर्गाला वयोमर्यादेतून सूट, EWS ला कोणतीही सूट नाही.)

उमेदवाराची निवड मेरिटद्वारे केले जाणार आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी – https://indiapost.gov.in किंवा https://appost.in/gdsonline