Coronavirus in India : देशात ‘कोरोना’चा हाहाकार ! देशातील रुग्णसंख्येचा नवा उच्चांक, 1619 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले. भारतात देखील कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक झाली आहे. यावर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून दीड कोटीचा टप्पा पार केला आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 2 लाख 73 हजार 810 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 619 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 50 लाख 61 हजार 919 वर पोहचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1 लाख 78 हजार 769 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (दि.9) दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 73 हजार 810 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 78 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 19 लाख 29 हजार 329 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर गेल्या 24 तासात देशात 1 लाख 44 हजार 178 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 1 कोटी 29 लाख 53 हजार 821 रुग्ण बरे झाले आहेत. देशात आजपर्यंत 12 कोटी 38 लाख 52 हजार 566 जणांना लस देण्यात आली आहे.