Delhi : देशातील सर्वात मोठे किडनी डायलिसिस हॉस्पीटल सुरू, रोज 500 रूग्णांवर मोफत होणार उपचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत देशातील सर्वात मोठी किडनी डायलिसिस सुविधा रविवारपासून सुरू झाली आहे. दिल्ली शिख व्यवस्थापन कमिटी (डीएसजीएमसी) ने रविवारी काले खां येथील बाला साहीब हॉस्पीटलचे विधीवत उद्घाटन केले. डीएसजीएमसीने सर्व रूग्णांना सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या हॉस्पीटलमध्ये दररोज 500 रूग्णांचे डायलिसिस होऊ शकते.

कॅश काऊंटर नाही
डीएसजीएमसी अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांच्यानुसार, हॉस्पीटलच्या सर्व सुविधांचे तंज्ञत्रान अधुनिक पद्धतीचे आहे, या सुविधा मोफत प्रदान केल्या जातील. यासाठी हॉस्पीटलमध्ये बिल जमा करण्यासाठी कॅश काऊंटर बनवण्यात आलेला नाही.

20 वर्षानंतर सुरू झाले
डीएसजीएमसीकडून 2000 मध्ये बाला साहीब हॉस्पीटल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते, परंतु वादामुळे अजूनपर्यंत हॉस्पीटल तयार होऊ शकले नव्हते. रविवारी डायलिसिस सुविधेच्या सुरुवातीसह हॉस्पीटलची औपचारिक सुरुवात झाली.

हॉस्पीटलचे उद्घाटन बाबा बचन सिंह यांनी केले. यावेळी पाटणा साहीबचे जत्थेदार ज्ञानी रणजीत सिंह, डीएसजीएमसी अध्यक्ष सरदार मनजिंदर सिंह सिरसा, तख्त पाटणा साहीब व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष जत्थेदार अवतार सिंह हित्त, डीएसजीएमसी महासचिव सरदार हरमीत सिंह कालका, शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

सर्व वर्गासाठी सुविधा
डीएसजीएमसी अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा आणि महासचिव कालका यांनी सांगितले की, डायलिसिस सुविधेचा मोफत लाभ समाजाच्या प्रत्येक वर्गातील रूग्णांना घेता येईल. मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिसपॉन्सिबिलिटी (सीएसआर), योगदान देणारे दानशूर यांच्या योगदानातून हॉस्पीटल चालवले जाईल. या क्षेत्रात देशात प्रसिद्ध असलेले डॉक्टर हॉस्पीटलचे व्यवस्थापन सांभाळतील.