India Squad NZ Series | न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! ‘या’ अष्टपैलू खेळाडूकडे देण्यात आहे कर्णधारपद

पोलीसनामा ऑनलाईन – India Squad NZ Series | टीम इंडिया सध्या रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड (T-20 World Cup) कपमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत टीम इंडियाने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. या वर्ल्डकपनंतर टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 टी 20 आणि 3 वनडे सामने खेळणार आहे. (India Squad NZ Series)

या खेळाडूंना देण्यात आली विश्रांती?

न्यूझीलंडनंतर टीम इंडिया बांग्लादेश विरुद्ध वनडे आणि टेस्ट सीरीज खेळणार आहे. दोन्ही दौऱ्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी टीमची घोषणा केली. न्यूझीलंडमधील टी 20 सीरीजसाठी (India Squad NZ Series) हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) कॅप्टन बनवण्यात आले आहे. तर रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुलला (K.L Rahul) न्यूझीलंड सीरीजसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

न्यूजीलंड टी20 सीरीजसाठी टीम- हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक

न्यूजीलंड वनडे सीरीजसाठी टीम- शिखर धवन (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन आणि उमरान मलिक.

बांग्लादेश वनडे सीरीजसाठी टीम: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली,
रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत , इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर,
शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, यश दयाल

बांग्लादेश टेस्ट सीरीजसाठी टीम: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली,
श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर,
मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.

Web Title :- India Squad NZ Series | india squad nz series hardik pandya to lead india t20 squad in nz kohli rohit to be rested sanju samson returns

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gas Cylinder Price | महागाईने होरपळलेल्या जनतेला मोठा दिलासा ! गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 115 रुपयांची कपात

Mumbai Indians | ज्युनियर ‘एबीडी’नं केला ‘हा’ मोठा पराक्रम, मुंबई इंडियन्स झाली खुश