भारताला सर्वात आधी मिळणार ‘कोविशिल्ड’ चे 5 कोटी डोस, आदर पुनवाला यांनी सांगितलं

पुणे: पोलिसनामा ऑनलाईन – देशात कोरोनाची लस येण्याची वाट पाहता आहेत. डिसेंबरमध्ये येणारी लस आता नवर्षाला येणार आल्याचे संकेत मिळत आहे. यापेक्षाही सोमवारी देशवासियांना एक दिलासादायक बातमी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे(Serum Institute of India) सीईओ अदर पुनावाला(CEO Adar Punawala) यांनी दिली आहे. ती म्हणजे कोरोना प्रतिबंधक लस ‘कोविशिल्ड’ला जानेवारीत नियामक मंडळाकडून मान्यता मिळेल. त्यानंतर लसीचे चार-पाच कोटी डोस सर्वात आधी भारतात दिले जातील.

या संदर्भात बोलताना पुनावाला म्हणाले, कोविशिल्डचे आमच्याजवळ चार-पाच कोटी डोस आहेत. एकदा आम्हाला काही दिवसांत लसीकरणाला परवानगी मिळाली की, आपण किती डोस घेऊ शकतो हे सरकारला निश्चित करावं लागेल. आम्ही जुलै २०२१ पर्यंत सुमारे ३० कोटी डोसची निर्मिती करु. २०२१ च्या आधी सहा महिने जागतिक स्तरावर डोस कमी पडतील पण यावर काही उपाय नाही. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ पर्यंत इतर लस निर्मिती कंपन्याही डोसची पूर्तता करण्यास सक्षम होतील, असंही पुनावाला म्हणाले.