युवकांसाठी भारतीय वायु दलात नोकरीची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारतीय वायुसेनेने एअरमॅनच्या पदासाठी मेगाभरती सुरु केली. इच्छुक आणि पात्र उमेदवार हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरती एअरमॅन ग्रुप एक्स ट्रेड, ग्रुप वाय ट्रेड, इंडियन एअर फोर्स पोलिस, इंडियन एअर फोर्स सिक्युरिटी आणि म्युझिक ट्रेड या पदांसाठी केल्या जातील. या भरतीसाठी फक्त भारतीय आणि नेपाळी अविवाहित तरुणच अर्ज करू शकतात. जाणून घ्या या संदर्भात..

ऑनलाइन अर्जासाठी उमेदवारांना ही कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
-दहावी मार्कशीट
-१२ वी मार्कशीट
-तीन वर्षे अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा समकक्ष
-पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
-उमेदवाराच्या डाव्या अंगठ्याचा ठसा
-उमेदवारीची सही
-उमेदवाराच्या पालकांची सही

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख : ०२ जानेवारी २०२०
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीखः २० जानेवारी २०२०

परीक्षा शुल्क:
सर्व उमेदवारांसाठी 250 रुपये परीक्षा शुल्क निश्चित केले गेले आहे.
परीक्षा शुल्क केवळ ऑनलाइन मोडद्वारे दिले जाईल.

महत्वाचे म्हणजे या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म १७ जानेवारी २००० ते ३० डिसेंबर २००३ दरम्यान असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण देताना उमेदवारांना १४,६०० रुपये वेतन दिले जाईल. त्यानंतर ग्रुप एक्स ट्रेडच्या उमेदवारांना ३३,१०० रुपये पगार तसेच अतिरिक्त भत्ता देण्यात येईल. तसेच प्रशिक्षणानंतर ग्रुप वाय ट्रेडसाठी २६,९०० रुपये पगार सोबतच भत्ता देण्यात येईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/