चीनच्या प्रत्येक हालचालींवर भारताचा ‘वॉच’; टॉप कमांडरचे लक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीन लडाखपासून आपले सैन्य आणि सैन्याचे सामान घेऊन मागे हटत आहे. मात्र, चीनचे यापूर्वीची कारस्थानं पाहता भारतीय लष्कराचे अधिकारी चीनच्या प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवत आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांत वादग्रस्त ठिकाणांवरून मागे हटण्याचा सामंजस्य झाला आहे. या सामंजस्यातून ड्रॅगन पँगोंग शो झीलच्या उत्तर आणि दक्षिण भागापासून सैन्य मागे घेण्यात आले आहे.

चीनकडून या ठिकाणांवरील तंबू आणि सैन्याचे साहित्य मागे घेतले जात आहे. यादरम्यान भारत चीनच्या प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवत आहे. त्यावरूनच आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी आज पूर्व लडाखच्या भागाचा दौरा केला. तिथे त्यांनी डिसइंगेजमेंट प्रक्रियेचा रिव्ह्यू घेतला. चीनने पूर्व लडाखमध्ये पँगॉंग त्सो झिलच्या किनाऱ्यावर मागील आठ तासांत सुमारे 200 टँक मागे घेतले आहे.

तसेच पिपल्स लिबरेशन आर्मीने जेट्टी, हेलिपॅड, टेंट आणि ऑब्जर्वेशन पॉईंट्सला नष्ट केले आहे. याची निर्मिती एप्रिल 2020 नंतर फिंगर 4 आणि फिंगर 8 च्या दरम्यान झाली होती. आता पँगाँग झिलच्या उत्तरी तटाचे 134 किमीमध्ये एका झावळ्यासारखा पसरला आहे आणि त्याचे विविध एक्सटेन्शन ‘फिंगर्स’च्या रुपात ओळखत आहे.