‘दृश्यम’ फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक

हैदराबाद : वृत्तसंस्था – ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’ आणि ‘दृष्यम’ यासारख्या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक आहे. निशिकांत कामत यांना Liver Cirrhosis चा त्रास होता. त्यामुळे त्यांना 11 ऑगस्ट रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र आता त्यांची प्रकृती चिंताजनक आहे . निशिकांत कामत यांचा 2020 मध्ये नवा चित्रपट येणार आहे. सध्या याची तयारी सुरु आहे. मराठी क्षेत्रापासून करिअरची त्यांनी सुरुवात केली. अनेक नाटकं त्यांनी गाजवली आहे.

निशिकांत कामत यांनी मराठी चित्रपट डोंबिवली फास्टपासून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. डोंबिवली फास्ट हा चित्रपट प्रेक्षकांनी खूप पसंत केला होता. त्यानंतर 2008 मध्ये मुंबई मेरी जान या चित्रपटातही त्यांच काम पहायला मिळलं. हिंदी चित्रपटसृष्टीत दृश्यम हा चित्रपट आयुष्यातील महत्त्वाचा पैलू ठरला या चित्रपटामुळे त्यांचे खूप कौतुक झाले. अजय देवगण, तब्बू यां सारख्या मोठ्या कलाकारांसह केलेल्या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले. कामत यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.