बालगंधर्वांमुळे भारतीय चित्रपट संगीतमय झाले : कीर्ती शिलेदार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बालगंधर्व यांच्या काळात मराठी रंगभूमीने सुवर्णयुग अनुभवले. मराठी संगीत नाटकांना भाषा, प्रांत या भेदांच्या पलिकडे नेण्याची किमया नटसम्राट बालगंधर्व यांच्यामुळे घडली. बालगंधर्वांच्या संगीत नाटकांमुळे भारतीय चित्रपटात संगीतमय झाले, असे मत अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केले.

पुणे महानगरपालिके मार्फत देण्यात येणारा संगीत, नाट्य व कला क्षेत्रांतील या वर्षीचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार ऑर्गनवादक चंद्रशेखर देशपांडे यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. नगरसेविका नीलीमा खाडे, माधुरी सहस्त्रबुध्दे, ज्योत्स्ना एकबोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

[amazon_link asins=’B07B23F2S1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ac6cc278-7add-11e8-8703-db7c665a4f77′]

या वर्षीचे बालगंधर्व विशेष पुरस्कार गायिका पोर्णिमा धुमाळे, नेपथ्यकार दत्ता गाडेकर, संगीत नाटक कलाकार राम साठ्ये, प्रकाश योजनाकार अनिल टाकळकर, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील उत्कृष्ट दिग्दर्शक ऋषी मनोहर यांना देण्यात आले. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप होते.

यावेळी कीर्ती शिलेदार पुढे म्हणाल्या की, ‘बालगंधर्वांचे गायन ललित मधुर, अजूनही गंधर्व सूर निनादतात, आजही संगीत नाटक म्हटल्यावर बालगंधर्व आठवतात, असा अद्वितीय, लोकोत्तर बालगंधर्व पुरस्कार ज्येष्ठ ऑर्गनवादक चंद्रशेखर यांना मिळतो तेव्हा अतिशय योग्य व्यक्तिचे कौतुक झाले अशीच भावना होते.’

बालपणी बालगंधर्वांचा सहवास लाभला, वडिल चंद्रशेखर हरिभाऊ देशपांडे यांच्यामुळे संगीत रंगभूमीची सेवा करण्याची संधी मिळाली. नाट्यसंगीताचे विद्या दान ६५ वर्षे करता आले. बालगंधर्व गायकीच्या सेवेत आयुष्य वेचता आले याचे समाधान आहे. विद्यादानाचे काम चालू ठेवणार असल्याची भावना चंद्रशेखर देशपांडे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.