पत्रकारांच्या हेरगिरीनंतर अडचणीत आलं WhatsApp, डिजीटल पेमेंट फिचरवर येऊ शकते बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वॉट्सअ‍ॅप आपली डिजिटल पेमेंट सेवा सुरु करणार आहे. परंतु हॅकिंगच्या कारणामुळे यावर बंदी येऊ शकते. पैसे पाठवण्यासाठी होणाऱ्या प्रणालीबाबत मोदी सरकार दक्षता बाळगून आहे. सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पेमेंट सेवेसाठी सुरक्षित प्लॅटफॉर्म असणे गरजेचे आहे. त्यामुळे वॉट्सअ‍ॅप लवकरच औद्योगिक मंत्रालयाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे.

सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह ?
हॅकिंगमुळे याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सरकारने वॉट्सअ‍ॅपला डेटा सुरक्षेबाबत काही प्रश्न विचारले होते. परंतु याचे आतापर्यंत काही उत्तर आलेले नाही. सध्या भारतात वॉट्सअ‍ॅपचे 40 कोटींहून अधिक युजर्स अ‍ॅक्टिव्ह आहेत. वॉट्सअ‍ॅपने गेल्या वर्षी दहा लाख युजर्स सोबत पेमेंट सर्विस बाबत टेस्टिंग केली होती. वॉट्सअ‍ॅपच्या या डिजिटल पेमेंट सिस्टीमुळे पेटीएम आणि गुगल पे ला मोठा फटका बसू शकतो.

भारत सरकारने व्यक्त केली चिंता
भारत सरकारने सांगितले की वॉट्सअ‍ॅप सोबत अनेकदा चर्चा झाली. मात्र हॅकिंगबाबत त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही. सरकारने याबाबत अनेक प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत. मात्र वॉट्सअ‍ॅपने सांगितले की या वर्षी मे महिन्यातच त्यांनी सरकारला हॅकिंगबाबत उत्तर दिले आहे.

भारतीय पत्रकारांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची होती हेरगिरी
वॉट्सअ‍ॅपने इस्राईलच्या ‘एनएसओ’ या कंपनीवर आरोप केले आहेत की त्यांनी भारतातील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी केली आहे. यासाठी पेगासस नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला. तसेच वॉट्सअ‍ॅपने हॅकिंगचा उल्लेख करत या इस्राईलच्या कंपनीवर केस देखील दाखल केली आहे.

काय आहे पेगासस
इस्राईलच्या एनएसओने बनवलेले पेगासेस हे सॉफ्टवेअर आहे. एनएसओने सांगितले आहे की त्यांनी हे सॉफ्टवेअर सरकारची मदत करण्यासाठी बनवले आहे. जेणेकरून सरकार आतंकवाद्यांपासून सुरक्षित राहील. या ग्रुपची सुरुवात 2010 मध्ये शलेव हुलिओ निव कार्मी आणि ओमरी लैवी हैतीन या तीन मित्रांनी मिळून केली होती.

Visit : Policenama.com