Indian Idol : स्पर्धक 1 आवाज 2 ! गाणं ऐकून हैराण झाले जज (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रिॲलिटी शो इंडियन आयडल 2020 (Indian Idol 2020) चा आणखी एक सीजन सुरू झाला आहे. सध्या याचा ऑडिशन राऊंड सुरू आहे. यातील एक से बढकर एक सादरीकरण पाहून सर्व जज विशाल ददलानी (Vishal Dadlani), नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) हैराण होताना दिसत आहेत. अशात असा स्पर्धक स्टेजवर दिसून आला ज्यानं सर्वांनाच चकित केलं.

स्पर्धकानं गायलं दोन आवाजात गाणं
एका स्पर्धकानं स्टेजवर येताच डबल धमाका केला. हा स्पर्धक मुलाच्या आवाजात तर उत्तम गातोच. परंतु मुलीच्या आवाजातही तो छान गातो. स्पर्धकाला अशा प्रकारे गाताना पाहून जज देखील हैराण झाले. सर्वांनी त्याचं खूप कौतुक केलं. यावेळी जजनं ज्या प्रकारे हावभाव केले होते ते पाहण्या सारखे होते.

 

 

या स्पर्धकाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांचंही त्याला खूप प्रेम मिळालं आहे. चाहते त्याच्या टॅलेंटचं खूप कौतुक करत आहेत. अनेक चाहत्यांनीही हे सादरीकरण पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. इंडियन आयडलच अनेक प्रोमो देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

You might also like