Indian Marathi Film Corporation | जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि यशवंत गायकवाड यांच्याकडून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दोन एकर जागा दान

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना कागदपत्रे सुपूर्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Indian Marathi Film Corporation | आपली सर्वांची दोन वर्षे कोरोना महामारीमुळे (Corona Epidemic) अतिशय वेदनादायक गेली आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने (Indian Marathi Film Corporation) अश्यावेळी आपल्या सभासदांसाठी अत्यावश्यक सामानाचे किट व आर्थिक मदत महामंडळाने करून त्यांना हातभार लावला आहे.

 

याच कलावंत सभासदांचा विचार सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी केला. कलावंतांच्या उतारवयात व उत्तर आयुष्यात त्यांना हक्काचे ठिकाण असावे ही गरज त्यांच्या लक्षात आली. त्यांची ही योजना कोण पुढे नेऊ शकेल असे ज्यावेळी त्यांना प्रश्न पडला तेव्हा त्यांच्या समोर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा (Indian Marathi Film Corporation) पर्याय दिसला, त्यांनी कामाची पद्धत पहिली होतीच, मोठ्या विश्वासाने त्यांनी ही जबाबदारी चित्रपट महामंडळावर सोपविली.

 

नुसता विचार न मांडता त्यांनी सर्वप्रथम यामध्ये स्वतःचे योगदान देण्याचा विचार केला, यासाठी त्यांनी स्वमालकीची जागा देऊ केली, यासाठी त्यांनी आपले भाचे यशवंत गायकवाड (Yashwant Gaikwad) यांनाही जागा देण्यास प्रवृत्त केले. दोघांनी मिळून दोन एकर जागा महामंडळाला दान दिली आहे. आजच्या रेटने या जागेचे बाजारमूल्य हे 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

विक्रम गोखले व यशवंत गायकवाड यांच्या औदार्याची माहिती करून देणे व या जागेचा वापर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे
कलावंतासाठी वृद्धाश्रम शुरु करण्यासाठी व कलावंतांची कला सादर साकारण्यासाठी खुला रंगमंच तयार करून वापरणार आहे.
ही जागा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) नाणे गावं येथे आहे.

 

नुकताच या जागेचा व्यवहार उपनिबंधक कार्यालयात रजिस्टर करून संपन्न झाला आहे.
ती कागदपत्रे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले (Meghraj Rajebhosale) यांना सुपूर्त करण्यात आली.

 

याप्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष सुप्रसिद्ध वात्रटिकाकार निर्माते व दिग्दर्शक रामदास फुटाणे (Ramdas Futane),
सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde), मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष व
अभिनेते रमेश परदेशी (Ramesh Pardeshi), सुप्रसिद्ध अभिनेते सुरेश विश्वकर्मा (Suresh Vishwakarma),
निर्माते वैभव जोशी (Vaibhav Joshi), निर्मिती प्रमुख अनिल उर्फ अण्णा गुंजाळ (Anil alias Anna Gunjal)
हे उपस्थित होते. अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सर्वाचे स्वागत केले. उपस्थितांमार्फत विक्रम गोखले व यशवंत गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.

 

Web Title :- Indian Marathi Film Corporation | Veteran actors Vikram Gokhale and Yashwant Gaikwad donate two acres of land to Akhil Bharatiya Marathi Film Corporation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | नगराध्यक्ष, सरपंच निवड थेट जनतेतून ही जनतेचीच मागणी, आमचा अजेंडा नाही; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

 

Ajit Pawar | सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडता मग मुख्यमंत्रीही का निवडत नाही? अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं

 

Mohit Kamboj-Rohit Pawar | ट्विट करत मोहित कंबोज म्हणाले – ‘बारामती अ‍ॅग्रो कंपनीचा…’