सुभाषचंद्र बोस यांचे ७५ रुपयांचे नाणे येणार चलनात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर इथे पहिल्यांदा तिरंगा फडकावल्याच्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून केंद्र सरकार ७५ रुपयांचे नाणे चलनात आणणार आहे. या संदर्भात अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.

अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, ७५ रुपयांच्या या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम असेल. ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे आणि ५ टक्के झिंक आणि ५ टक्के जस्त धातूपासून हे नाणे बनवले जाणार आहे.

या नाण्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा छापलेली असेल. सेल्युलर जेलच्या मागे तिरंग्याला सलामी देणाऱ्या सुभाषचंद्रबोस यांची प्रतिमा नाण्यावर मुद्रित केली जाणार आहे, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.

चिंताजनक… दररोज २ हजार शेतकरी शेती सोडून रोजगाराकडे वळतात : पी. साईनाथ 

त्यांच्या प्रतिमेखाली ७५ अंक लिहिला आहे. यासोबतच नाण्यावर देवनागरी आणि इंग्लिशमध्ये प्रथम ध्वजारोहण दिवस ही लिहिलेले असेल. सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरमध्ये ३० डिसेंबर १९४३ रोजी पहिल्यांदा तिरंगा फडकावला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ आॅक्टोंबर रोजी लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकावला होता. तसेच आजाद हिंद सरकारच्या स्थापनेची  ७५व्या वर्षानिमित्त स्मारक पट्टिकेचेही अनावरण केले होते.