बदलणार आहे तुमचा स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर, ट्रान्सपरंटसह असा असेल लुक! पहा फोटो

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आता लाल रंगाचा तुमचा लोखंडाचा स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर बदलणार आहे. नवीन सिलेंडर वजनाने हलका आणि ट्रान्सपरंट असेल. यामुळे सिलेंडर संपल्याचे तुम्हाला सहज समजू शकते. इंडियन ऑईलने फोटोसह ही माहिती दिली आहे. या सिलेंडरमध्ये आणखी काय विशेष असणार आहे ते जाणून घेवूयात…

इंडियन ऑईलच्या माहितीनुसार, आता इंडेनकडून कंपोझिट एलपीजी सिलेंडर सादर केला जात आहे. हा सिलेंडर सध्या दिल्ली आणि हैद्राबादमध्ये उपलब्ध आहे. नवा सिलेंडर लोखंडाच्या सिलेंडरसारखा नाही, तर खुप स्टायलिश आणि दिसायला खुप वेगळा आहे. सिलेंडरला पकडण्यासाठी हँडल आहे.

काय विशेष आहे या सिलेंडरमध्ये ?
* जुन्याच्या तुलनेत याचे वजन 50 टक्के कमी आहे.
* आकर्षक लुक आहे.
* पारदर्शक बॉडी असल्याने बाहेरूनही गॅसचा अंदाज येतो. त्यामुळे फसवणूक होणार नाही.
* जंग पकडणार नाही.
* हा सिलेंडर 5 आणि 10 किलो वजनात उपलब्ध असेल.
* याच्यामुळे किचनची शोभा वाढेल.

सुरक्षेकडे दिले आहे खास लक्ष
इंडियन ऑईलने सुरक्षेबाबत म्हटले आहे की सेफ्टी आमची प्राथमिकता आहे आणि सिलेंडर स्टायलिश बनवण्यासह सेफ्टीबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही. हा वापरण्यास एकदम सुरक्षित आहे.