कोरोना काळात ‘दुप्पट’ झाला ‘या’ सरकारी बँकेचा नफा, इन्कममध्ये सुद्धा वाढ

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँकेचा (Indian Overseas Bank) नफा दुप्पटीपेक्षा जास्त झाला आहे. इंडियन ओव्हरसीज बँके(Indian Overseas Bank) चा नफा दुप्पटीपेक्षा जास्त होऊन सुमारे 350 कोटी रुपयांवर पोहचला आहे. यापूर्वी मागील आर्थिक वर्षाच्या समान तिमाहीत बँकेने 144 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. बँकेने म्हटले की, मार्च तिमाहीच्या दरम्यान त्यांचे एकुण उत्पन्न वाढून 6,074 कोटी रुपयांवर पोहचले, जे याच्या मागील आर्थिक वर्षाच्या समान तिमाहीत 5,484 कोटी रुपये होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

संपूर्ण आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये बँकेचा शुद्धा लाभ 831.47 कोटी रुपये होता. मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये बँकेला 8,527.40 कोटी रुपयांचा शुद्ध तोटा झाला होता. आर्थिक वर्षाच्या दरम्यान बँकेचे एकुण उत्पन्न वाढून 22,525 कोटी रुपयांवर पोहचले, जे मागील आर्थिक वर्षात 20,712.48 कोटी रुपये होते.

या तिमाहीत बँकेची बुडीत कर्जाची तरतूद आणि इतर आकस्मिक खर्च वाढून 1,380 कोटी रुपयांवर पोहचला, जो मागील आर्थिक वर्षाच्या समान तिमाहीत 1,060 कोटी रुपये होता.

आयओबीच्या संपत्तीच्या गुणवत्तेमध्ये या दरम्यान सुधारणा झाली. 31 मार्च, 2021 ला बँकेचा एनपीए कमर होऊन 11.69 टक्के राहीला, जो एक वषापूर्वी 14.78 टक्केवर होता. या दरम्यान बँकेचा शुद्ध एनपीए सुद्धा 5.44 टक्केने कमी होऊन 3.58 टक्के राहीला.

बँकेच्याशेअरमध्ये वाढ :
दरम्यान, इंडियन ओव्हरसीज बँकेच्या (IOB) शेयरमध्ये वाढ नोंदली गेली आहे.
बँकेच्या शेयर भावात 2 टक्केपेक्षा सुद्धा जास्त वाढ नोंदली गेली आहे.
बँकेचा शेयर भाव 21.10 रुपये आहे.
बँकेचे मार्केट कॅपिटल 34 हजार कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :indian overseas bank posted net profit of rs 350 crore in the fourth quarter


हे देखील वाचा

LIC New Jeevan Shanti Policy | एकदाच करा गुंतवणूक, निवृत्तीनंतर भासणार नाही पैशांची चणचण

three dead body in pune | पुण्यात वेगवेगळ्या भागातील कॅनॉलमध्ये आढळले 3 मृतदेह

Builder Avinash Bhosale | सरकारने जाहीर केलेल्या ‘या’ सवलतीचा लाभ घेऊन घेतला तब्बल 103 कोटींचा फ्लॅट

Spa Center in pimpri chinchwad | स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश, एकाला अटक

Modi Government Cabinet Expansion | मोदींच्या मंत्रिमंडळात ‘या’ दिग्गजांना मिळणार संधी? महाराष्ट्रातील 3 नावे चर्चेत

Actor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन हंसराज झाला बेरोजगार