Indian Railways | रेल्वे प्रवासाचा अचानक बदलला प्लॅन, तर तिकिट कॅन्सल न करता ‘या’ पध्दतीनं बदला प्रवासाची तारीख; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Indian Railways |अनेकदा असे होते की, आपण ट्रेनचे रिझर्व्हेशन (train reservation) करतो, परंतु ऐनवेळी आपला प्लॅन बदलतो. अशा स्थितीत तुम्ही ट्रेन प्रवास Preponed किंवा Postponed सुद्धा करू शकता. तुम्ही आपल्या प्रवासाचे बोर्डिंग स्टेशन सुद्धा बदलू शकता. मात्र, यापैकी काही सुविधा केवळ ऑफलाइन तिकिटासाठी लागू आहेत, तर इतर ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्हीसाठी उपलब्ध आहेत.indian railways reservation how to change journey date upgrade to higher class and more

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

1 ट्रेन प्रवासाची तारीख बदलू शकता

भारतीय रेल्वे (Indian Railways ) प्रवाशांना सुविधा देते की, ते आपल्या कन्फर्म/RAC/वेटिंग तिकिटात प्रवासाची तारीख बदलू शकतात. मात्र ही तारीख तुम्ही केवळ एकदाच बदलू शकता. प्रवाशांना रिझर्व्हेशन ऑफिसात जाऊन ट्रेन सुटण्याच्या 48 तास अगोदर तिकिट सरेंडर करावे लागेल. ही सुविधा केवळ ऑफलाइन तिकिटासाठी आहे. ऑनलाइनसाठी नाही.

2 प्रवासाचा विस्तार सुद्धा करू शकता

ज्या स्टेशनपर्यंत तिकिट बुक केले आहे, त्याच्या पुढील स्टेशनपर्यंत जाण्यासाठी प्रवासी उतरण्याच्या ठिकाणी पोहचण्यापूर्वी किंवा बुक प्रवास पूर्ण झाल्यानंतर तिकिट चेकिंग स्टाफशी संपर्क करून प्रवासाचा विस्तार करू शकता.

3 बोर्डिंग स्टेशन सुद्धा बदलू शकता

प्रवासी मूळ बोर्डिंग स्टेशनच्या स्टेशन मॅनेजरला लेखी अ‍ॅप्लीकेशन देऊन किंवा ट्रेन सुटण्याच्या किमान 24 तास अगोदर एखाद्या कॉम्प्युटराईज्ड रिझर्व्हेशन सेंटरवर जाऊन प्रवासाचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकता. ही सुविधा ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारच्या तिकिटावर आहे.

4 तिकिट उपग्रेड करू शकता

समजा बुकिंग स्लीपर क्लासमध्ये आहे आणि तुम्हाला थर्ड AC किंवा सेकेंड AC मध्ये अपग्रेड करायचे असेल तर प्रवासाच्या दरम्यान TTE शी बोलावे लागेल. सीट उपलब्ध असेल तर टीटीई तिकिट अपग्रेड करू शकतो. यासाठी जादा पैसे द्यावे लागतील. आणि एकदाच बदल करता येईल.
Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : indian railways reservation how to change journey date upgrade to higher class and more

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हाला काही नको’,
तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हला काही नको’,
तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम