नवी दिल्ली : Indian Railways Rules | खुप कमी लोकांना माहित आहे की, ट्रेन तिकिटासोबत तुम्हाला अनेक सुविधा सुद्धा मिळतात. या सुविधा जाणून घेणे तुमचा अधिकार (Indian Railways Rules) आहे. तुम्हाला कधीही त्यांची गरज भासू शकते. ट्रेनच्या तिकिटासोबत कोण-कोणत्या सुविधांचा लाभ घेऊ शकता ते जाणून घेवूयात…
1. इन्श्युरन्स
आयआरसीटीसीकडून ऑनलाइन तिकिट खरेदी करताना ठराविक अल्प शुल्क भरल्यास तुम्हाला प्रवासात इन्श्युरन्सची सुविधा (Indian Railways Rules) मिळते. रेल्वे अपघातात मृत्यु किंवा अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये भरपाई मिळते. अंशता अपंगत्व आल्यास 7.5 लाख रूपये मिळतात. उपचारासाठी 2 लाख मिळतात. यासाठी 49 पैसे भरावे लागतात.
2. फर्स्ट ऐड बॉक्स
ट्रेन प्रवासात तब्येत बिघडल्यास तुम्ही टीटीईकडून फर्स्ट ऐड बॉक्स मागू शकता.
3. वायफाय
काही रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सुविधा सुद्धा दिली जाते.
4. वेटिंग रूम
ट्रेन उशीरा येणार असेल तर तुम्हाला वेटिंग रूमध्ये तिकिटाच्या क्लासच्या आधारावर आराम करता येतो.
5. क्लॉक रूम
रेल्वेकडून प्रवाशांना क्लॉक रूमची सुविधा दिली जाते. तुमच्याकडील ट्रेनच्या व्हॅलिड तिकिटावर तुम्ही स्टेशनवरील क्लॉक रूमचा वापर करू शकता. सामान जमा करून ट्रेन येईपर्यंत कुठेही जाऊन येऊ शकता.
FD मध्ये Investment करताना ‘या’ 10 गोष्टी जाणून घेणे आवश्यक, गुंतवणुकीवर होतो थेट परिणाम; जाणून घ्या