वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जानेवारी आणि फेब्रुवारी 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील एकदिवसीय विश्वकरंडक होणार आहे. यासाठी भारतानं आपला संघ जाहीर केला आहे. 17 जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेतील 19 वर्षांखालील एकदिवसीय विश्वकरंडकासाठी भारतीय संघात पुढील खेळाडूंचा समावेश असेल-

प्रियांक गार्ग(कर्णधार), ध्रुवचंद जुरेल(उपकर्णधार-यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना,दिव्यांश जोशी, शुभंग हेगडे, आकाश सिंग, कुमार कुशग्रा (यष्टिरक्षक), सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील, शाश्वत रावत, रवी विश्नोई, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर.

अशा प्रकारे भारतीय संघानं आपल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यापूर्वी भारतीय संघानं 4 वेळा 19 वर्षांखालील विश्वकरंडक जिंकला आहे. त्यामुळे यावेळीही भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

पुढील वर्षी महिला आणि पुरुष ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहेत. या स्पर्धेचीही सर्वांना उत्सुकता आहे. त्यापूर्वीच जानेवारी आणि फेब्रुवारी 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील एकदिवसीय विश्वकरंडक होणार आहे.

Visit : Policenama.com

You might also like