World Cup 2019 : भारतीय संघ खेळणार ‘भगव्या’ जर्सीत

नवी दिल्ली: वृत्तसंस्था- आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ ची सुरूवात येत्या ३० मे पासून होत आहे. इंग्लंडमधील ११ शहरांत तब्बल ४८ सामने रंगणार आहेत. क्रिकेट प्रेमींसाठी हा क्रिकेटचा कुंभमेळाच आहे. जगातील सर्वोत्तम १० देशांचा समावेश असलेली हि स्पर्धा चार वर्षातून एकदा खेळवण्यात येते. जगभरातील क्रिकेट रसिक याकडे डोळे लावून बसलेले आहेत.

मेन इन ब्लू अशी ओळख असलेला भारतीय संघ या विश्वचषकात वेगळ्याच रंगाच्या जर्सीत खेळताना दिसून येणार आहे. भारतीय संघ निळ्या रंगाच्या जर्सीबरोबरच भगव्या रंगाच्या जर्सीत देखील खेळताना दिसून येणार आहे. जर्सीबाबत आयसीसीने यंदाच्या विश्वचषकासाठी फुटबॉलच्या धर्तीवर ‘होम’ आणि ‘अवे’ असा नवा प्रस्ताव ठेवला आहे. या नियमानुसार यजमान संघ वगळता प्रत्येक संघ पर्यायी जर्सीमध्ये दिसणार आहे. सध्या भारतीय संघ निळ्या रंगाच्या आणि भगव्या रंगछटा असलेली  जर्सी वापरात आहे.

या सगळ्यात आता विश्वचषकातील काही सामन्यात भारतीय संघ आता भगव्या रंगाच्या जर्सीत दिसून येण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान ज्या देशांची जर्सी एकाच रंगाची असेल त्यातील एका संघाला आपल्या जर्सीचा रंग बदलता येऊ शकतो. त्यामुळे बीसीसीआयने भगव्या रंगाची जर्सी हि पर्यायी म्हणून वापरण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

काय आहे या मागचे कारण
विश्वचषकात भारत, इंग्लंड, अफगाणिस्तान, श्रीलंका या संघांची जर्सी निळ्या रंगाची आहे.  जर्सीबाबत आयसीसीने यंदाच्या विश्वचषकासाठी फुटबॉलच्या धर्तीवर होम आणि अवे असा नवा प्रस्ताव ठेवला आहे. या नियमानुसार यजमान संघ वगळता प्रत्येक संघ पर्यायी जर्सीमध्ये दिसणार आहे. त्यामुळे भारतीय संघ इंग्लंड आणि अफगाणिस्तानविरुद्ध भगव्या रंगाच्या जर्सीमध्ये आपल्याला खेळताना दिसून येतील. भारताप्रमाणेच बांगलादेश आणि पाकिस्तान यांना  देखील आपल्या जर्सीमध्ये बदल करावे लागणार आहेत.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय संघ भगव्या जर्सीमध्ये सामना खेळण्यास उतरला तर हा आमच्या डोळ्यांवर अन्याय आहे. कृपया असे करु नका, अश्या प्रकारचे ट्विट एका भारतीय चाहत्याने केले आहे. तर काही चाहत्यांनी हा भाजपच्या भगव्या लाटेचा परिणाम असल्याचे ट्विट केले आहे.

https://twitter.com/sud2rock/status/1131523395034570752

You might also like