ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्टच्या वतीने देशव्यापी संप 

मुंबई  : पोलिसनामा ऑनलाईन

ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्टच्या वतीने अनिश्चित काळाकरिता उद्यापासून देशव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. यात राज्यातील मोटार मालक, ट्रान्सपोर्ट धारक यांचा देखील सहभाग असणार आहे. डिझेलची दरवाढ कमी करण्यात यावी, टोल टॅक्स माफ करण्यात यावा, वाहतूक असेच इन्शुरन्सच्या समस्या आदी मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वाहन,चालक-मालक प्रतिनिधी महासंघाच्या वतीने देण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B011NXM92E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7c79219b-8b5e-11e8-9ad1-f7976aac52e1′]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, देशात ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या नॉर्थ व साऊथ अशा दोन संघटना आहेत. त्यांचे राज्यात जवळपास पाच लाख सभासद आहेत. यापूर्वी देखील संघटनेच्या वतीने देशाच्या विविध भागात आंदोलने करण्यात आली होती. त्यानंतर आता शुक्रवारी (दि.२०) सकाळी सहा वाजल्यापासून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. यादरम्यान एकही मालवाहतूक करणारी गाडी रस्त्यावर उतरवण्यात येणार नाही. या मालवाहू गाड्या पार्किंगमध्येच उभ्या करण्यात येणार आहेत.

यांचाही आंदोलनात समावेश 

या आंदोलनामध्ये ऑल इंडिया परमिट असलेली वाहने, कंपनीच्या लोकांना ने-आण करणार्‍या गाड्यासह डीझेलवर चालणाऱ्या वाहनांचे चालक यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या स्कूल बसचाही यामध्ये समावेश आहे. खासगी कॅब, टुरिस्ट कार यांचा देखील समावेश असणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्कूलबसचालक केवळ २ ते ३ दिवस आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.

काय होणार परिणाम 

या आंदोलनामध्ये मालवाहू गाड्यांचा देखील समावेश असल्यामुळे व्यापारी वर्गावर याचा परिणाम होण्याची शक्याता आहे. यामुळे इतर राज्यातून किंवा इतर शहरांमधून आणला जाणारा भाजीपाला, रोजच्या वापरातील वस्तू यांच्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणाऱ्या स्कुल बसचा समावेश असणार आहे. मात्र विद्यार्थ्यंची गैरसोय होऊ नये याकरिता स्कुल बस फक्त दोन दिवसाच या आंदोलनात सहभागी असतील. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपापल्या जबाबदारीवर बस चालू ठेवाव्यात, असेही असोसिएशनने म्हटले आहे. तसेच, एकदिवसीय संपाचा निर्णय उशिरा कळवत असलो, तरी आमच्याकडे संपाशिवाय कुठलाच पर्याय नव्हता, असेही असोसिएशनने म्हटले आहे.

[amazon_link asins=’B074W9GH6G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8caaa383-8b5e-11e8-a220-19b926559199′]
काय आहेत मागण्या?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जीएसटीअंतर्गत आणाव्यात, जेणेकरुन किंमती कमी होतील.

इंधनांचे दर सहा महिन्यातून एकदा निश्चित करावेत.

स्कूल बसच्या चॅसिसचे एक्साईज ड्युटी माफ करावी.

मुंबईतल्या सर्व टोल नाक्यांवर टोलमाफी द्यावी.

महाराष्ट्रातील सर्व टोलनाक्यांवर स्कूल बसचा प्रवास मोफत करावा.

विमा हफ्त्यात कपात करावी.

आरटीओकडून होणारी वार्षिक तपासणी बंद करावी आणि बस स्कूल बस सेफ्ट कमिटीकडून तपासणी करावी.

शाळेभोवती पार्किंगसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी.

रस्ते खड्डेमुक्त करावे.