भारतीयांना ‘या’ 16 देशात विना Visa करता येणार प्रवास, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   कोरोना प्रादुर्भावाचा मोठा फटका परदेशी आणि देशांतर्गत पर्यटनाला बसला आहे. सध्या काही देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाला बंदी आहे. दरम्यान भारतीयांना विना व्हिसा किंवा व्हिसा ऑन अरायव्हल अथवा ईटीए सुविधेसह 53 देशात प्रवेश करता येणार आहे. या 53 देशांच्या यादीत नेपाळ, भूटानसह 16 देशांमध्ये भारतीयांना व्हिसाची गरज नाही. तर ईराण, म्यानमारसह 34 देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा किंवा ई व्हिसाची सुविधेचा वापर करता येईल. श्रीलंकेसहित 3 देशांमध्ये प्रवासासाठी ईटीए सुविधा उपलब्ध आहे. ईटीए म्हणजे व्हिसा नाही. परंतु या ठिकाणी प्रवास करण्यापूर्वी तिथल्या प्रशासनाची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. भारतीयांना 145 देशात जाण्यासाठी व्हिसाची गरज लागते.

या 16 देशांत व्हिसाची गरज नाही

बाराबडोस (90 दिवसांकरिता विना व्हिसा प्रवास), भूटान (14), डॉमिनिका (180) , एल साल्वाडोर (90) , झांबिया (90), ग्रॅनाडा (90) हैती (90) नेपाल (विना व्हिसा प्रवास), फिलीस्तीन टेरीटरीज (विना व्हिसा प्रवास) सेंट किट्स अँड नेविस (90), सेनेगल (90), सर्बिया (30), सेंट विन्ंसेट अँड द ग्रेनाडिन्स (30) त्रिनिदाद अँड टोबॅगो (90) ट्युनिशिया (90), वालूआतू (30 दिवस) आदी देशात विना व्हिसा प्रवास करता येणार आहे.

34 देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल

तर कोमोरोस, झिबौती , इथियोपिया, गाबोन, गिनीया, अर्मेनिया, बोलविया, केप वेर्डे, गिनीया बिस्साऊ, ईराण, केनया, लेसोथो, मादागास्कर, मालवी, मालदिव, मॉरिटेनिया, म्यानमार, नायजेरिया, पलाऊ, रशियन फेडरेशन, रवांडा, सेंट ल्युसिया, सामोआ, सुरीनाम, टांझानिया, टोगो, तुवालू, यूगांडा,सेशेल्स, सिएरा लियोन, सोमालिया, दक्षिण सूडान, उझबेकिस्तान आणि झिम्बाब्वे या देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल किंवा ई व्हिसा या सुविधांचा लाभ घेता येऊ शकतो. या शिवाय आइवरी कोस्ट जमैका आणि श्रीलंका या तीन देशांमध्ये ईटीए या सुविधेचा लाभ भारतीयांना घेता येतो.