Influenza Vaccine | कोरोना महामारीमध्ये इन्फ्लूएंजा व्हॅक्सीन देतंय सुरक्षा ‘कवच’, Covid च्या गंभीर प्रभावांपासून करतंय ‘बचाव’ – संशोधन

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Influenza Vaccine | कोरोना (Corona) संसर्गापासून बचाव करण्यात इन्फ्लूएंजा व्हॅक्सीन खुप परिणामकारक ठरत आहे. ही गोष्ट एका संशोधनात समोर आली आहे. संशोधनात आढळले की, ज्या लोकांनी इन्फ्लूएंजा (Influenza Vaccine) ची व्हॅक्सीन घेतली त्यांच्यात कोरोना व्हायरसचे गंभीर परिणाम कमी दिसून आले. इतकेच नव्हे, त्यांना आपत्कालीन देखरेखीची आवश्यकता सुद्धा कमी भासली.

द गार्डियन न्यूज पेपरमध्ये प्रकाशित संशोधनात याबाबत माहिती देण्यात आली आहे. संशोधनानुसार, सुमारे 75,000 कोरोना रूग्णांच्या विश्लेषणांनतर हे गोष्ट समोर आली आहे. संशोधनात सहभागी रूग्णांमध्ये आढळले की, ज्या लोकांनी 6 ते 8 महिने अगोदर इन्फ्लूएंजा व्हॅक्सीन घेतली होती, त्यांच्यात स्ट्रोक, डीप वेन थ्रम्बोसिस म्हणजे डीव्हीटी आणि सेप्सिस सारख्या गंभीर समस्या दिसून आल्या नाहीत. इतकेच नव्हे, त्यांना इमर्जन्सी वार्ड आणि इन्टेन्सिव्ह केयर यूनिटची आवश्यकता भासली नाही.

काय सांगते नवीन संशोधन

नवीन संशोधनात आढळले की, ज्या लोकांनी इन्फ्लूएंजा व्हॅक्सीन घेतली त्यांना कोरोना महामारीदरम्यान गंभीर समस्यांचा सामना करावा लागला नाही. परंतु असेही नाही की फ्लू व्हॅक्सीन जीवघेण्या परिस्थितीत लोकांना वाचवू शकते.

परंतु हे सत्य आहे की इन्फ्लूएंजा व्हॅक्सीन कोरोना महामारीच्या गंभीर परिणामांपासून वाचण्यासाठी एक ‘शस्त्र’ म्हणून उपयोगी पडू शकते. अखेर इन्फ्लूएंजा व्हॅक्सीन कोरोनापासून कसा बचाव करते हे अजून संशोधनात समजलेले नाही.

तज्ज्ञांचे म्हणणे काय आहे

युनिव्हर्सिटी ऑफ मियामी क्लिनिकल सर्जरी विभागाचे प्रोफेसर आणि या संशोधनाचे सिनियर लेखक डॉ. देवेंद्र सिंह यांनी सांगितले की, जर हे पूर्णपणे सिद्ध झाले त त्या देशांसाठी दिलासादायक असेल ज्यांना अजूनपर्यंत कोरोना व्हॅक्सीन उपलब्ध होऊ शकलेली नाही.

मात्र इन्फ्लूएंजाची लस कोणत्याही प्रकारे कोविड-19 व्हॅक्सीनऐवजी घेता येऊ शकत नाही. कोरोनापासून बचावासाठी कोरोना व्हॅक्सीनच सर्वात चांगला पर्याय आहे.

काय आहे इन्फ्लूएंजा व्हॅक्सीन

सीडीसीनुसार, इन्फ्लूएंजा (Flu) शॉट एका इंजेक्शनसोबत दिली जाणारी फ्लू ची व्हॅक्सीन आहे.
जी सामान्यपणे डाव्या हातावर घेतली जाते.
हा शॉट हंगामी फ्लूपासून बचाव करतो आणि हा किमान तीन ते चार व्हायरसपासून आपल्याला संरक्षण देतो.

केव्हा घेऊ शकता इन्फ्लूएंजा व्हॅक्सीन

इन्फ्लूएंजा व्हॅक्सीन प्रत्येक वर्षी मान्सून किंवा थंडीच्या पूर्वी घेतले जाऊ शकते.
ही 6 महिन्याच्या बाळापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना दिली जाऊ शकते.
ही व्हॅक्सीन जवळपास प्रत्येक हॉस्पिटल किंवा पिडिएट्रिशियन क्लिनिकमध्ये उपलब्ध असते.

Web Title : Influenza Vaccine | flu vaccine may reduce severe effects of covid suggests study

eAadhaar | आधारसोबत नसताना कसे पूर्ण होईल बँकिंगपासून तिकिट घेण्यापर्यंतचे प्रत्येक महत्वाचे काम, UIDAI ने दिली मोठी अपडेट

Crime News | इमारतीवरून नवजात बालिकेला खाली दिले फेकून;
विरारमधील धक्कादायक घटना

‘कंगाल’ झालाय पाकिस्तान ! इस्लामाबादमध्ये पंतप्रधान निवासस्थान
भाड्याने देण्याची केली घोषणा