पुन्हा कठुआ : मध्यप्रदेशात तीन वर्षांच्या मुलीवर अमानुष बलात्कार

बुरहाणपूर : वृत्तसंस्था

मध्यप्रदेशातील बुरहाणपूर येथे कठुआसारखाच संतापजनक आणि माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. याठिकाणी एका तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला असून मृतदेहावर चावे घेतल्याच्या जखमा सर्वत्र दिसून येत होत्या. शिवाय या मृतदेहाचा डावा हात गायब आहे.

पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या ठिकाणाचा पंचनामा केला असून व्हिसेरा तपासणीसाठी पाठविला आहे. व्हिसेरा व अन्य तपासण्या पूर्ण झाल्यानंतर अनेक बाबी समोर येणार आहेत. ही छकुली बुधवारी सकाळपासून बेपत्ता झाली होती. बुधवारी सकाळी ती घरासमोरील अंगणात खेळत होती. तिचे आजोबा वऱ्हांड्यात बसले होते. तर आई-वडील शेतावर कामासाठी गेले होते, याचवेळी ती गायब झाली, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी दिली.
[amazon_link asins=’B008V6T1IW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1d14223a-a3ca-11e8-8aa1-ab2288a726c5′]
ही छकुली खेळता-खेळता गायब झाल्याने तिच्या अजोबांनी तिला हाका मारण्यास सुरूवात केली. मात्र, कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. ती कुठेही न आढळल्याने अखेर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्या हरवल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, आजी-आजोबांनी मुलीच्या आई-वडीलांनाही घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तेही पोलीस ठाण्यात पोहोचले.

पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. तसेच परिसरात कसून शोध घेतल्यावरही मुलगी सापडली नाही. अखेर शनिवारी या छकुलीचा मृतदेह तिच्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आढळून आला. पोलिसांनी  मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळावर कसून शोध घेतला असता काहीही सापडले नाही. उत्तरीय तपासणीसाठी छकुलीचा मृतदेह शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर सिव्हील सर्जन शकील खान यांनी सांगितले की, मुलीच्या अंगावर सर्वत्र चावे घेतल्याच्या व अन्य जखमा मोठ्याप्रमाणात आहेत. एकुणच मुलीच्या शरिरावरील जखमा पाहिल्या असता अतिशय निर्दयीपणे तिच्यावर अत्याचार करण्यात आला असावा तसेच ठार मारण्यात आले असावे.