Instant Sugar Control | इन्स्टंट शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज इतक्या प्रमाणात प्या भेंडीचे पाणी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Instant Sugar Control | rfppl.co.in वर प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात दावा करण्यात आला आहे की, भेंडीचे (Okra) सेवन केल्याने शुगर कंट्रोलमध्ये (Sugar Contro) राहते. हे संशोधन पुदुचेरीच्या (Puducherry) अनेक गावांमध्ये करण्यात आले. संशोधनात पाच गावातील डायबिटीज रूग्णांचा समावेश करण्यात आला होता. या संशोधनात त्यांना दोन गटात विभागण्यात आले. पहिल्या गटातील सदस्यांना तीन महिन्यापर्यंत रोज 50 ग्रॅम आवळा ज्यूस (Amla Juice) पिण्याचा सल्ला देण्यात आला.

तर, दूसर्‍या टीममधील लोकांना तीन महिन्यापर्यंत रोज 50 ग्रॅम भेंडीचे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला. यासाठी दुसर्‍या टीमला रोज रात्री झोपण्याच्या पूर्वी साधारण एक ग्लास पाण्यात एक किंवा दोन भेंडी भिजवून ठेवायला सांगण्यात आले. दुसर्‍या दिवशी सकाळी हे भेंडीचे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला होता.

या संशोधनानुसार तीन महिन्यानंतर जेव्हा शुगर लेव्हल मोजण्यात आली, तेव्हा दुसर्‍या गटातील लोकांमध्ये शुगरचा स्तर कमी आढळून आला. यासाठी संशोधक डायबिटीजच्या रूग्णांना भेंडीच पाणी पिण्याचा सल्ला देतात. सोबतच भेंडी खाल्ल्याने सुद्धा इन्स्टंट शुगर कंट्रोल होण्यास मदत होते.
डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज 50 ग्रॅम भेंडीचे पाणी प्यावे.

Web Title : Instant Sugar Control | health drink 50 gram lady finger water daily to control blood sugar

Accident in Toranmal | नंदुरबार जिल्ह्यात भीषण अपघात, क्रूझर दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Red Light | ‘सौदा जरी केलास तू माझ्या शरीराचा’ ! राजेश्वरी खरातचा नवा अंदाज,
‘रेड लाईट’चं पोस्टर रिलीझ (व्हिडीओ)

Monsoon Healthy Diet | मान्सूनमध्ये तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांनी होईल नुकसान,
आजारांपासून बचावासाठी ‘या’ 7 गोष्टींचे करा सेवन; जाणून घ्या