मोठा दिलासा ! आता जन्मापासून असणाऱ्या आजारांवरही मिळेल ‘क्लेम’; ‘विमा’ देण्यास मनाई करणार नाही कंपनी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आगामी काळात कोणत्याही रोग, आजार याबाबत विमा देण्यास विमा कंपन्या मनाई करता येणार नाही. विमा नियामक (आयआरडीएआय)ने विमा कंपन्यांना स्पष्टपणे याबाबत सांगितले आहे की, रोग जन्मजात असला तरीही विमा कंपन्या कोणालाही पॉलिसी देण्यास नकार देऊ नये.

’जन्मजात आजार असला तरी मिळेल क्लेम’ :
राष्ट्रीय विमा अकादमीच्या कार्यक्रमात आयआरडीएआयचे अध्यक्ष सुभाषचंद्र खुंटिया बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, जर एखाद्या व्यक्तीस जन्मजात रोग किंवा आजार असेल त्यासाठी विमा कंपनी पॉलिसी देत नसेल तर हे योग्य नाही. त्या व्यक्तीच्या हाती नसलेल्या रोगासाठी कंपन्यांना विमा संरक्षण देण्यास नकार देऊ नये. आयआरडीएआयने सांगितले की, विमा कंपन्यांनी या प्रकरणात काळजी घेणे आवश्यक आहे. अधिक डेटा विश्लेषण करून पॉलिसीधारकांना विमापासून दूर ठेवणे चुकीचे आहे.

विमा कंपन्या मूल्यवर्धित सेवा सुरू करणार :
विमा कंपन्यांना त्यांच्या सेवा सुधारण्यासाठी व्हॅल्यू -अ‍ॅडेड सर्व्हिसेस द्यावी, असा सल्ला कार्यक्रमात त्यांनी दिला. पॉलिसीसह मूल्यवर्धित सेवा मिळवून ग्राहकांना चांगल्या सुविधा द्याव्यात. आयआरडीएआयने सांगितले की, यामुळे पॉलिसी असलेल्या विमाधारकाचा किंवा ग्राहकांचा अनुभव सुधारेल. पुढे खुंटिया म्हणाले की, लवकरच विमा कंपन्या विमा उत्पादनांसह मूल्यवर्धित सेवा ही दिल्याने पॉलिसीधारकांना अधिक चांगले आणि योग्य वाटेल.

अशा असतील मूल्यवर्धित सेवा :
विमा कंपन्या त्यांच्या विमा पॉलिसींमध्ये ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा प्रदान करतील. जसे मधुमेहाच्या रुग्णाला कोणती आहार घ्यावा आणि कसा घ्यावा, याचा प्लॅन कसा ठेवला पाहिजे. काय खावे आणि काय खाऊ नये? त्यांना फिटनेस कोचचा देखील सल्ला दिला जाईल. आरोग्य तपासणी करावी.

विमा नियामक आयआरडीएआय म्हणते की, आता विमा कंपन्यांनी रुग्णाला रोगांपासून स्वतःचे रक्षण कसे करावे?, तंदुरुस्त कसे रहावे?यावर अधिक भर दिला पाहिजे. जेणेकरून किमान त्याला रुग्णालयात यावे लागणार नाही. विमा कंपन्यांचे लक्ष त्यांच्या सेवा सुधारण्यावर अधिक असले पाहिजे.

कोविडचा दावा
खुंटिया यांनी सांगितले की, कोरोनाचे आतापर्यंत 1736.3 कोटी रुपयांचे दावे देण्यात आले आहेत. ज्यामध्ये कोरोना कवच स्की क्लेम 700 कोटींचा आहे. तर साथीच्या रोगाशी संबंधित जीवन विमा हप्ते 1242 कोटी रुपये असून ते परत केले गेले आहेत.

विम्यात मोठ्या प्रमाणात नवकल्पना
विमा कंपन्यांनी कोरोनामध्ये हजारो कोटींचे दावे निकाली काढले आहेत. उत्तम तंत्रज्ञानाच्या मदतीने जोखीमही कमी केली जात आहे. काही वृत्तानुसार, सँडबॉक्सच्या नियमांमुळे विम्यात मोठ्या प्रमाणात नावीन्यता आहे. याचा परिणाम म्हणजे कंपन्यांनी नाविन्यपूर्ण उत्पादनांमध्ये रस वाढविला आहे. विशेषत: आरोग्य आणि प्रमाणित उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मानक उत्पादनांमध्येही नवकल्पना यांचा समावेश केला जात आहे. डेटाद्वारे रिस्क फॅक्टर ओळखले जात आहेत. तसेच, विमा कंपन्यांनी डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेकडे अधिक लक्ष देणे गरजेचं आहे.