जाणून घ्या कोण-कोणत्या स्थितीत एक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्यासाठी ठरू शकते ‘लाभदायक’ !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी (health insurance policy) आपले जीवन सोपे आणि चांगल्या पद्धतीने जावे यासाठी आपण भविष्याच्या योजना बनवतो. मुलांचे शिक्षण, लग्न आणि स्वताच्या रिटायर्मेंटसाठी आपण बचत आणि गुंतवणूक करतो. आपल्या जाण्यानंतर कुटुंबाला कोणताही त्रास होऊ नये यासाठी आपण जीवन विमा उतरवतो. अशाच प्रकारे मेडिकल इमर्जन्सीच्या स्थितीचा सामना करण्यासाठी आपण आरोग्य विमा काढतो. मेडिकल इमर्जन्सी कधीही येऊ शकते, हे आपल्याला कोरोना महामारीने चांगल्या प्रकारे समजावले आहे, आणि जेव्हा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल होते, तेव्हा बेड आणि औषधांचा वाढता खर्च त्याची बेचैनी वाढवतो. अशावेळी आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे महत्व वाढते. एखाद्या व्यक्तीसाठी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे महत्व काय आहे, ते जाणून घेवूयात…

Pravin Darekar : ‘उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी, शरद पवार यांनी त्यांच्या हाताखाली काम करावं’

आता 1 जूनपासून देशांतर्गत विमान प्रवास महागणार, सरकारनं 16 टक्क्यांपर्यंत वाढवले भाडे; जाणून घ्या नवे दर

 

बदलती जीवनशैली
बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक आजार होत असतात. अशावेळी मेडिकल इमर्जन्सीमध्ये एक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी (health insurance policy) खुप लाभदायक ठरते. यामुळे तुम्ही चांगला उपचार करू शकता.

Pravin Darekar : ‘उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी, शरद पवार यांनी त्यांच्या हाताखाली काम करावं’

 

कंपनीकडून मिळणारे कव्हर पुरसे नाही
कंपनीकडून मिळणारे मेडिकल कव्हर तुमच्यासाठी एक अतिरिक्त कव्हर होऊ शकते, परंतु ती तुमच्यासाठी पूर्ण हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी नाही. हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीत अनेक सुविधा मिळतात, म्हणून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आवश्यक आहे.

हॉस्पिटल आणि औषधांचा खर्च खुप जास्त
सध्या हॉस्पिटलचा खर्च खुपच वाढला आहे, येथे उपचार करताना आपली सर्व बचत खर्च होऊ शकते. यासाठी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी आवश्यक आहे.

गंभीर आजारात हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी आवश्यक
गंभीर आजारातील सुरुवातीच्या टेस्ट महागड्या असतात. याशिवाय इतर खर्च सुद्धा खुप मोठा असतो. अशावेळी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी उपयोगी येऊ शकते.

टॅक्समध्ये सूट
हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी हेल्थ कव्हरसह इतरही फायदे देते. या पॉलिसी द्वारे इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट 80सी अंतर्गत टॅक्समध्ये सूट मिळवू शकता. ही सूट प्रीमियमवर अवलंबून आहे.

आपल्या गरजेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पॉलिसी तुम्ही खरेदी करू शकता. जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल तर रिलायन्स जनरल इन्श्युरन्सची हेल्थ गेन इन्श्युरन्स पॉलिसी घेऊ शकता. यामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा आहेत. तसेच इतरही अनेक कंपन्यांच्या चांगल्या पॉलिसी बाजारात उपलब्ध आहेत.

READ ALSO THIS :

आता 1 जूनपासून देशांतर्गत विमान प्रवास महागणार, सरकारनं 16 टक्क्यांपर्यंत वाढवले भाडे; जाणून घ्या नवे दर

आता 1 जूनपासून देशांतर्गत विमान प्रवास महागणार, सरकारनं 16 टक्क्यांपर्यंत वाढवले भाडे; जाणून घ्या नवे दर

EDLI Benefits : PF खातेधारकाच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळते 7 लाख रुपयांची रक्कम, जाणून घ्या ‘क्लेम’बाबत

‘ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर घाला हे भाजपचे पाप, फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा !’