वाहतूकीचे नियम मोडणे आता आणखी महाग, जाणून घ्या सविस्तर

पोलिसनामा ऑनलाईन – रस्ते अपघातात ७० टक्के जीव वेगाने गाडी चालवल्याने जातो. सध्या देशात रस्ते दुर्घटनेत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जगात सर्वाधिक आहे. रस्ते मंत्रालयाच्या माहितीनुसार, जवळपास ४.६७ लाख रस्ते दुर्घटना २०१८ मध्ये झाल्या आहेत. यात १.५१ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेला आळा घालण्यासाठी इन्शूरन्स रेग्युलेटर विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इरडा) च्या वर्किंग कमिटीने काही शिफारसी केल्या आहेत. यानुसार ट्रॅफिक नियम मोडल्यास मालकांना आता जास्त विमा भरावा लागणार आहे.

ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्यास दंड निर्धारित करण्यात आले आहेत. मद्य प्राशन करून गाडी चालवल्यास १०० पट अधिक दंड भरावा लागणार आहे. जितकी जास्त गुण तितका जास्त दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे दारु पिऊन गाडी चालवल्यास १०० गुण, खतरनाक ड्रायविंग ९० गुण, पोलिसांशी हुज्जत ९० गुण, ओव्हर स्पीडिंग, रेसिंग ८० गुण, लायसन्स विना ड्रायविंग ७० गुण, चुकीच्या रस्त्यावर ड्रायविंग ७० गुण, ट्रॅफिक सिग्नल मोडणे ५० गुण, ओव्हरलोडिंग ४० गुण, चुकीची पार्किंग १० गुण असे दंड निर्धारित करण्यात आले आहे.

वर्ल्ड रोड स्टॅस्टिक्सच्या माहितीनुसार, जगात १९९ देशात भारत रोड अपघातात सर्वात पुढे आहे. यानंतर चीन आणि अमेरिकेचा नंबर लागतो. डेटाच्या माहितीनुसार, एकूण रस्ते अपघातात ७० टक्के लोकांचा जीव हा अधिक वेगाने गाडी चालवल्यामुळे होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन (WHO) च्या माहितीनुसार, २०१८ मध्ये जगभरातील अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जगाच्या ११ टक्के एकट्या भारतातील होती.

इरडाने १ फेब्रुवारी पर्यंत सूचना मागितल्या आहेत. विमा कंपन्यांना NIC कडून माहिती मिळेल. विमा रेग्युलेटरने २० जानेवारी पर्यंत ९ सदस्यांच्या वर्किंग कमिटीच्या शिफारसीचा ड्राफ्ट जारी केला आहे. यात संबंधित पक्षांना १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत सूचना मागितल्या आहेत. अनुराग रस्तोगी वर्किंग कमेटीचे चेअरमन होते. जे HDFC एर्गो जनरल इंश्योरेंस कंपनी लि. चे चीफ एक्चुअरी अँड चीफ अंडरराइटिंग ऑफिसर आहेत.