‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची वैशिष्ट्ये तुम्हाला माहित आहेत का ?

गांधीनगर : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं आज लोकार्पण होणार आहे. गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या किनारी सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.  जगातला हा आत्तापर्यंतचा सर्वात भव्य पुतळा आहे. या स्मारकाचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. या निमित्तानं जगातील सर्वात भव्य पुतळ्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात –
स्टॅच्यू ऑफ युनिटीची वैशिष्ट्ये –

१) लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा १८२ मीटर लांबीचा असून त्याचं वजन १७०० टन आहे. पुतळ्यासाठी ७५ हजार घनमीटर काँक्रीट, पाच हजार ७०० मेट्रिक टन स्टील स्ट्रक्चर, १८ हजार ५०० लोखंडी सळ्या आणि २२ हजार ५०० टन ब्राँझचा वापर करण्यात आला आहे. हे शिल्प जगातील सर्वात उंच शिल्प आहे. या पुतळ्याच्या पायांची उंची ८० फूट, हाताची उंची ७० फूट आहे.

देशातील मंदिरे भाजपच्या मालकीची आहेत का ? : राहुल गांधी 

२) गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील कावेडिया भागात सरदार सरोवर धरणाच्या दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या साधू बेटावर हा पुतळा उभारण्यात आलाय. पुतळा उभारण्यासाठी देशभरातील सात लाख गावांमधून लोखंड गोळा केल्याचा गुजरात सरकारचा दावा.
३ ) स्टॅच्यू ऑफ युनिटीची निर्मिती शिल्पकार राम सुतार यांनी केली आहे. राम सुतार हे त्यांच्या खास शैलीच्या पुतळ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक पुतळे जगातील विविध देशांमध्ये आहेत.
४ ) चीन मधील स्प्रिंग टेम्पलमध्ये असलेल्या गौतम बुद्धाच्या पुतळ्याची उंची १५३ मीटर आहे. हा पुतळा आत्तापर्यंत जगातला उंच पुतळा मानला जायचा, मात्र ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ने त्याचा पुतळ्याचाही रेकॉर्ड मोडला आहे.
५) ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची निर्मिती ३३ महिन्यात करण्यात आली आहे. या पुतळ्याच्या निर्मितीत ३ हजार ५०० पेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता.
६) सरदार पटेल यांचे हे शिल्प साकारण्यासाठी सुमारे २ हजार ९८९ कोटी रुपये खर्च आला आहे.
७) या पुतळ्याचे काम ३१ ऑक्टोबर २०१३ मध्ये सरदार पटेल यांच्या १३८ व्या जयंतीच्या औचित्याने सुरु करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.
८) लोकार्पण सोहळ्यासाठी ‘युनिटी ट्रेन’ नावाची ट्रेनही धावणार आहे. या ट्रेनमधून वाराणसी, मिर्झापूर, अलाहबाद,रायबरेलीहून लोक या ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे.