जागतिक पुरुष दिन : या गोष्टी बनवतात पुरुषाला परिपूर्ण 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महिला दिन कधी असतो या प्रश्नाचे उत्तर आपण लगेच देऊन टाकतो ८ मार्च परंतु आपणाला हे माहित नसते जागतिक पुरुष दिन कधी असतो ? या प्रश्नाचे उत्तर आहे जागतिक पुरुष दिन हा आज म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी असतो.

जागतिक पुरुष दिन साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाकडून हि पाठिंबा दर्शवण्यात आला असून जगातील ३० हुन अधिक देशात हा दिवस साजरा केला जातो. स्त्री पुरीष समानतेला चालना मिळण्यासाठी हा दिवस महत्वाचा ठरणार आहे. जागतिक पुरुष दिन हा फक्त पुरुषांकडूनच साजरा केला जात नसून तो अनेक ठिकणी तरुण मूलांकडून हि साजरा केला जातो आहे. पुरुष म्हणून आपली काही कर्तव्य असतात त्या कर्तव्याच्या स्पुर्तीसाठी आणि पुरुषाला परिपूर्ण बनवण्यासाठी महत्वाच्या असतात त्यावर  महत्वाच्या ठरतील अशा बाबी पुढील प्रमाणे सांगा येतील.

नाते निभावताना त्यात अहम नसावा
पुरुषांचा स्वभाव शक्यतो ताठर अथवा रागिष्ट वाटतो म्हणून त्यांनी मृदू भाषेत बोलावे तसेच  त्यांनी वागताना मृदु धोरणाचा अवलंब करावा जेणे करून सगळी नाती निभावण्यासाठी मार्ग सुखकर होतील. तसेच आपल्या पेक्षा लहान असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मोकळीक देत चला.

आपल्या कुटुंबासाठी वेळ द्या
पुरुषांसाठी सगळ्यात महत्वाचा सल्ला म्हणजे पुरुषाने आपल्या कुटुंबाला वेळ दिला पाहिजे. कुटुंबाला वेळ दिल्याने आपण कुटुंबाचा विश्वास आणि प्रेम कमवू शकता. तसेच कुटुंबाला घेऊन आपण बाहेर जात जा जेणेकरुन आपल्या कुटुंबाची नाळ अधिक घट्ट होऊ शकेल. आपल्या नातेवाईक मंडळींमध्ये आपण स्नेह मेळाव्याचे आयोजन करावे जेन करून आपल्या कुटुंबाबद्दल नातेवाइकांचा आदर वाढेल. तसेच तुमच्या व्यक्तिमत्वा बद्दल हि आदर व्यक्त केला जाईल.

घरातील कामात जोडीदाराला मदत करा
आपण घर कामात आपल्या जोडीदाराला मदत करत असाल तर आपल्या जोडीदाराला आपल्या बद्दल आदर आणि प्रेम निर्माण होईल. आपल्या जोडीदाराच्या प्रति आदर ठेवा तसेच आपल्या घरात केलेल्या मदती मुळे आपली प्रतिमा कुटुंबवत्सल बनण्यास मदत होईल.

आपल्या घरच्या व्यक्तींपासून काहीही लपवू नका
आपल्या घरच्या व्यक्तींचा आपण आदर केला पाहिजे तसेच आपण घरच्या व्यक्तींपासून काहीही लपवून ठेवता कामा नये जेणे करून आपल्याला घरचे वातावरण विश्वासाचे बनून राहील.

आपल्या घरात आपले व्यक्तिमत्व परिपूर्ण बनवण्यासाठी या बाबी  महत्वपूर्ण ठरू शकतात त्यामुळे आपण आपले व्यक्तिमत्व नेहमी चैतन्ययुक्त आणि वरील बाबींची सशक्त ठेवले तर आपण परिपूर्ण पुरुष बनू शकता.