16 व्या वर्षीच जगातील सुपरहिट स्टार बनली होती ‘रिहाना’ ! आज 4400 कोटींची मालकीन

पोलिसनामा ऑनलाईन – हॉलिवूड सिंगर, पॉप स्टार, अ‍ॅक्ट्रेस रिहाना (Rihanna) सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. तिनं शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिल्यानं तिच्यावर काहींनी टीकाही केली आहे. बारबाडोसमध्ये एका मिडल क्लास फॅमिलीतून येऊन प्रसिद्धीचं शिखर गाठणाऱ्या रिहानानं आपला तिसरा अल्बम गुड गर्ल गॉन बॅड मधून धुमाकूळ घातला होता. या अल्बममधील साँग अंब्रेलासाठी तिला पहिला ग्रॅमी अवॉर्ड मिळाला होता.

15 व्या वर्षी रिहानानं आपल्या 2 क्लासमेट्सला घेऊन एक गर्ल ग्रुप बनवला होता. तिनं म्युझिक प्रोड्युसर इवान रोजर्सला ऑडिशन दिलं होतं, जे आपल्या पत्नीसोबत बारबाडोस मध्ये फिरायला आले होते. ते रिहानाच्या आवाजानं खूप प्रभावित झाले. एका वर्षाच्या आतच रिहाना जेव्हा 16 वर्षांची होती तेव्हा ती बारबाडोस सोडून अमेरिकेला गेली होती. तिनं एका अल्बमवर काम करायला सुरुवात केली होती. यानतंर तिनं कधीच मागे वळून पाहिलं नाही.

रिहानाचं लहानपण खूप अडचणीत गेलं आहे. तिचे वडिल एक ड्रग अ‍ॅडिक्ट आणि दारुडे होते. यामुळं रिहानाच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर रिहानानं एमिनेम, केल्विन हैरिस, केनी वेस्ट, जे जी अशा अनेक लिजेंडरी आर्टीस्ट सोबत काम केलं आहे. ती आपल्या चॅरिटीसाठीही ओळखली जाते.

2006 साली जेव्हा रिहाना 18 वर्षांची होती तेव्हा तिनं बिलीव फाऊंडेशन बनवली होती. ही पब्लिक संस्था कॅन्सर, एड्स आणि ल्युकेमिया सारख्या आजारांशी लढणाऱ्या मुलांना मदत करते.

2008 साली रिहानानं अनेक सेलेब्सला जॉईन करत एड्स बद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी फॅशन कॅम्पेनमध्ये भाग घेतला होता. एच अँड एम कंपनीनं हे कॅम्पेन चालवलं होतं. यावर्षी तिनं एक टीव्ही स्पेशल स्टँड अप टू कॅन्सरमध्ये भाग घेतला होता. कॅन्सर रिसर्चसाटी केल्या जाणाऱ्या या प्रोग्रामसाठी ही संस्था 100 मिलियन डॉलर्सची रक्कम जमवण्यात यशस्वी झाली होती.

यानंतर 2012 साली रिहानानं क्लारा लियोनेल फाऊंडेशन नावाच्या संस्थेची सुरुवात केली होती. क्लारा आणि लियोनेल रिहानाच्या आजीआजोबाचं नाव आहे. बारबाडोस मध्ये राहणाऱ्या लोकांना शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित सुविधा पुरवणं हा या संस्थेचा हेतू आहे. बारबाडोसमध्ये वादळानं प्रभावित झालेल्या लोकांनाही ही संस्था मदत करते.

रिहानाननं काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरस विरोधातील लढ्यात 8 मिलियन डॉलर्स दिले होते. याशिवाय तिनं क्लारा लियोनेल फाऊंडेशनच्या मदतीनं न्यूयॉर्कच्या गरजूंना 1 मिलियन डॉलर्स, लॉस एंजेलिसच्या लोकांना 2.1 मिलियन डॉलर्स आणि दुसऱ्या एका संस्थेला 5 मिलियन डॉलर्सची मदत केली होती. रिहानाची नेट वर्थ 600 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 4400 कोटी आहे. ती फक्त म्युझिकच्याच नव्हे तर मेकअप आणि लाँजरी ब्रँडच्या मदतीनं देखील कमाई करते.

रिहानानं या व्यतिरीक्त बीड 2 बीट एड्स, सिटी ऑफ होप, फिडिंग अमेरिका, सेव द चिल्ड्रन, युनिसेफ, एल्जाएमर असोसिएशन, लिव अर्थ, किड्स विश नेटवर्क, मिशन ऑस्ट्रेलिया अशा अनेक संस्थांसोबत काम केलं आहे. रिहानाला तिच्या चॅरिटी वर्कसाठी पीटर ह्युमनिटेरियन अवॉर्डही मिळाला आहे. इंस्टाग्रामवर रिहानाचे लाखो चाहते आहेत जे तिला फॉलो करतात. रिहानाच्या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती मिळत असते. सोशलवर ती कायमच सक्रिय असते.