International Yoga Day In Pune | पाण्यात योगासने करत महिला जलतरणपटूंनी केला योग दिन साजरा (Video)

पोलीसनामा ऑनलाइन – International Yoga Day In Pune | विविध प्रकारची योगासने, ओंकारचा जप आणि अखेरीस विठ्ठल विठ्ठल गीतावर नृत्य अशा उत्साहपूर्ण वातावरणात महिला जलतरणपटूंनी बुधवारी बालगंधर्व परिसरातील नांदे तलावात (Nande Swimming Tank) आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day In Pune) साजरा केला.

 

 

एम फिटनेस सेंटरतर्फे (M Fitness Club) नांदे तलावात महिला जलतरणपटूंसाठी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त योगासने प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. सेंटरच्या योग थेरपिस्ट सोनाली मगर मोरे (Sonali Magar More) व त्यांच्या सहकार्यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिकरण सादर केले. त्यानूसार महिला जलतरणपटूंनी पाण्यात योगासने केली. तसेच ओंकारचा जप ही करण्यात आला. (International Yoga Day In Pune)

 

अखेरीस विठ्ठल विठ्ठल गीतावर नृत्य करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी द चॅम्पियन क्लबच्या (The Champion Club) जलतरण प्रशिक्षक किर्ती देव (Kirti Dev), प्रज्ञा उपस्थित होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी पाण्यात योगासने केली. यावेळी महाविद्यालयीन युवती, शालेय विद्यार्थीनींनी बरोबर ज्येष्ठ महिलांनी देखील उत्साहाने सहभाग घेतला.

 

 

Web Title :  International Yoga Day In Pune | Women swimmers celebrated Yoga Day by doing yoga in water

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा