Video : ‘या’ गाण्यावर रोहित, जसप्रीत, सूर्यकुमार आणि पांड्या बंधूंचा तुफान डान्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   यंदा ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेला प्रारंभ होत आहे. तर मुंबई इंडियन संघातील खेळाडू जेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करण्यासाठी धडपड करणार आहेत. MI च्या संघातील सर्वच खेळाडू हे खुशमध्ये दिसत आहेत. IPL पहिला सलामी सामना मुबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा रंगणार आहे. त्या अगोदर MI खेळाडूंनी तुफान डान्स करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. तर ते गाणे म्हणजे आगरी गाण्यावर डान्स केलाय.

मुबई इंडियन्सच्या खेळाडूंनी प्रसिद्ध आगरी गाणं ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ यावर छानदार डान्स केला आहे. डान्स करत असताना रोहित, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार आणि हार्दिक-कृणाल पांड्या बंधू दिसत आहेत. नाचत असलेले हे क्रिकेटपटूचे व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित झाला आहे.

दरम्यान, IPLच्या इतिहासात सलग ३ वेळा जेतेपद पटकावण्याची संधी मुंबई इंडियन्सला आहे. आतापर्यंत एकाही संघाला हा पराक्रम करता आलेला नाही. मुबई इंडियन्सने २०१९ व २०२० रोजी अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सा यांच्यावर विजय मिळवून IPL जेतेपदं नावावर केली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ५ जेतेपद पटकावली आहे. चेन्नई सुपर किंग्सनं ३ वेळा, तर कोलकाता नाइट रायडर्सनं २ वेळा ही कामगिरी केलीय.