हिंदीसोबतच 7 भारतीय भाषांमधून केली जाणार IPL ची Commentary, 100 जणांची ‘फौज’ तयार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   जगप्रसिद्ध टी 20 लीग इंडियन प्रीमियर लीगला (IPL) आजपासून सुरूवात होत आहे. यात सुनील गावस्कर, गौतम गंभीर आणि केविन पीटरसन यांच्यासोबत 100 कमेंटेटर कमेंट्रीची जबाबदारी स्वीकारतील. यावेळी आयपीएलचे प्रसारण हिंदीसह सात भारतीय भाषांमध्ये केले जाणार आहे. गावसकर इंग्रजी व्यतिरिक्त हिंदीही सांभाळतील. इंग्रजीमध्ये त्यांना आपला मुलगा आणि माजी भारतीय क्रिकेटपटू रोहन गावस्कर यांच्यासमवेत कमेंट्री करताना पहायला मिळेल.

आयपीएलचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स तसेच डिस्ने, हॉटस्टारच्या विविध वाहिन्यांवर केले जाईल. स्टार इंडियाच्या प्रसिद्धीनुसार- आयपीएलच्या 14 व्या सत्रात विविध भाषेतील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंना कमेंट्री टीममध्ये जोडले जाईल. या भाषांमध्ये इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि मराठीचा समावेश आहे.

गावस्करशिवाय हिंदी कमेंट्री टीममध्ये आकाश चोप्रा, निखिल चोपडा, गौतम गंभीर, अजित आगरकर, इरफान पठाण, पार्थिव पटेल, आरपी सिंग आणि दीप दासगुप्ता यांचा समावेश आहे. गंभीर म्हणाले- गेल्या काही वर्षांत हिंदी कमेंट्रीची लोकप्रियता वाढली आहे आणि मी पुन्हा हिंदी कमेंट्री टीममध्ये भाग घेण्यास उत्सुक आहे.