BCCI ची घोषणा ! IPL 2021 च्या राहिलेल्या मॅच UAE मध्ये होणार, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील ( IPL 2021) उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे खेळवणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) BCCI ऑनलाईन पद्धतीने विशेष वार्षिक सभा आज पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. तसेच या बैठकीत ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनावरही चर्चा करण्यात आली. मात्र, बीसीसीआयनं यासाठी आयसीसीकडे थोडा वेळ मागितला आहे.

मासिक पाळीदरम्यान कोरोना व्हॅक्सीन घेणे किती सुरक्षित ? जाणून घ्या एक्सपर्टकडून

सूत्रांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार, परदेशी क्रिकेट संघटनेसोबत खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत बीसीसीआय BCCI चर्चा करणार आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळतील, परंतु न्यूझीलंड व इंग्लंडच्या खेळाडूंबाबत अनिश्चितता आहे. त्यावर आमचे काम सुरू आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आणखी एक महिन्याची वाट पाहणार आहे. ” आयपीएल २०२१च्या उर्वरित ३१ सामने १८ किंवा १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत यूएईत होणार असल्याची चर्चा आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत इंग्लंड, न्यूझीलंड व अफगाणिस्तानचे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर आहेत. त्यात कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या पर्वाची घोषणा झाली आहे. त्यामुळे आयपीएल २०२१च्या पहिल्या १० दिवसांत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या सहभागावरही संकट आलं आहे.

दरम्यान, १४ सप्टेंबरला भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपणार आहे आणि त्यानंतर लगेचच आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना सुरूवात होईल. भारत व इंग्लंडचे खेळाडू थेट लंडनहून यूएईत दाखल होतील. ते एका बायो-बबलमधून येणार असल्यानं त्यांना यूएईत क्वारंटाईन होण्याची गरज नाही. पण, अन्य खेळाडूंच्या बाबतीत हा नियम लागू होणार नाही.

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी