IPS Deven Bharti | वरीष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची बृहन्मुंबईच्या विशेष आयुक्तपदी नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आयपीएस अधिकारी देवेन भारती (IPS Deven Bharti) यांची बृहन्मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त (Brihanmumbai Special Commissioner of Police) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस देवेन भारती यांची नेमणूक झालेले विशेष पोलीस आयुक्त पद हे नव्याने निर्मित करण्यात आले आहे. देवेन भारती (IPS Deven Bharti) हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांच्या अत्यंत जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्याकडे मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस (IPS Deven Bharti) अधिकारी आहेत. ज्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी देवेन भारती हे सर्वात पॉवरफूल अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना देवेन भारती हे मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात सहआयुक्त Joint CP (कायदा व सुव्यवस्था) आणि एटीएस (ATS) प्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. मात्र, ठाकरे सरकार (Thackeray Government) आल्यानंतर त्यांची एटीएस प्रमुख पदावरुन बदली करण्यात आली होती. परंतु त्यांना नवीन पोस्टिंग मिळाली नसल्याने सव्वा महिने ते त्याच पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांची केलेली बदली प्रत्यक्षात अपर पोलीस महासंचालक (Addl DGP) महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर केली.

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.
मुंबई पोलीस आयुक्त अखत्यारीतील पाच सह पोलीस आयुक्तांच्या बदल्या करुन त्याठिकाणी नवीन
अधिकाऱ्यांची नेमणूक केली. यातून देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्यावर एकहाती कंट्रोल असल्याचे दाखवून दिले होते.

Web Title :- IPS Deven Bharti | deven bharti appointed as special commissioner of police mumbai