IPS Officer Rashmi Shukla | रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार? पोलीस नेतृत्व बदलाबाबत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप (Phone Tapping Case) असलेल्या पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त (Pune Former CP) रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांची पोलीस महासंचालक (DGP) किंवा मुंबईच्या आयुक्त (Mumbai CP) म्हणून राज्यात पुन्हा नियुक्ती होणार असल्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) महाराष्ट्रात परतणार असल्याची माहिती मंगळवारी सूत्रांनी दिली होती. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Rajnish Seth) आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांच्या जागी नवीन चेहरे आणण्याचा राज्य सरकारचा सध्या कोणताही विचार नसल्याचे फडणवीसांनी सांगितलं.

रजनीश सेठ आणि विवेक फणसाळकर यांना लगेच बदलणार का, असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावर त्यांनी थेट उत्तर देताना नाही, त्यांचे काम ठीक चालले आहे. फणसाळकर तर आता नवीनच आले आहेत ना, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. दोघांचीही नियुक्ती ही महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात झाली होती. त्यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) येताच दोघांनाही बदलले जाईल अशी चर्चा सुरु झाली. त्यातच सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांना फोन टॅपिंग प्रकरणात क्लीन चिट मिळाल्याने त्या पुन्हा राज्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

रश्मी शुक्ला या पोलीस महासंचालक किंवा मुंबई पोलीस आयुक्त म्हणून येऊ शकतात, असे तर्क दिले गेले.
नवीन सरकारच्या त्या विश्वासातील मानल्या जातात.
शुक्ला यांचे महासंचालक म्हणून केंद्रात एम्पॅनेलमेंट होण्याची शक्यता आहे.
त्यासाठी त्या स्वत:ही इच्छूक असल्याचे समजते. जून 2024 मध्ये त्या निवृत्त होणार आहेत.
त्यामुळे राज्यात लगेच परत येण्याची त्यांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे.

Web Title :-IPS Officer Rashmi Shukla | rajnish seth phansalkar will remain the government is currently not thinking of changing the police leadership

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | भांडारकर रोडवर रिक्षाचालकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले

Hindustan Unilever (HUL) | ‘हे’ शॅम्पू वापरणे ताबडतोब बंद करा, कॅन्सरचा धोका असल्याने कंपन्याने उत्पादने घेतली मागे