IRCTC Luggage Rules | आता विमान प्रवासाप्रमाणे ट्रेनमध्ये जादा बॅग नेण्यासाठी भरावे लागेल शुल्क, रेल्वेने लागू केले नवीन नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IRCTC Luggage Rules | आता विमान प्रवासाप्रमाणेच ट्रेनमध्ये जादा बॅगा नेण्यासाठी प्रवाशांना शुल्क भरावे लागणार आहे. तुम्ही बॅगच्या बुकिंगशिवाय अतिरिक्त बॅग घेऊन जाताना दिसल्यास, भारतीय रेल्वे (Indian Railways) तुमच्याकडून सामान्य दरांपेक्षा 6 पट जास्त शुल्क आकारेल. भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसीने आता ट्रेनमध्ये अतिरिक्त बॅग (IRCTC Luggage Rules) घेऊन जाण्यासाठी शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. (Indian Railways To Charge You For Carrying Extra Bag)

 

इतके वजन मोफत घेऊन जाऊ शकता
तुम्ही एसी फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत असाल तर तुम्ही 70 किलोपर्यंतचे सामान मोफत घेऊन जाऊ शकता. AC 2-Tier साठी ही मर्यादा 50 kg आहे. एसी 3-टायर स्लीपर, एसी चेअर कार आणि स्लीपर क्लासमध्ये 40 किलोपर्यंत सामान ठेवण्याची परवानगी आहे.

म्हणजे इतका किलो माल नेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. द्वितीय श्रेणीमध्ये 25 किलो सामानाची परवानगी आहे. त्यानंतर शुल्क भरावे लागेल. किमान शुल्क 30 रुपये आहे. (IRCTC Luggage Rules)

सामान कसे बुक करावे ?
तुमची ट्रेन सुटण्याच्या अर्धा तास आणि 30 मिनिटे आधी बुकिंग स्टेशनवर सामान दाखवावे लागते.
तिकीट बुक करताना प्रवासी आपले सामानही आगाऊ बुक करू शकतात. यासंदर्भात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.

जे सामान सुरक्षितपणे पॅक केलेले नसेल ते बुकिंग आणि कॅरेजसाठी स्वीकारले जाणार नाही.
नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये मंत्रालयाने म्हटले होते की, जास्त सामान घेतले तर प्रवासाची मजा अर्धवट राहील ! खूप सामान घेऊन ट्रेनने प्रवास करू नका. जास्त सामान असल्यास, पार्सल ऑफिसला भेट द्या आणि सामान बुक करा.’

 

Web Title :- IRCTC Luggage Rules | railways to charge you for carrying extra bag how to book penalty other details of irctc luggage rule indian railway

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा